जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन तीन ते चार महिन्यापासून रखडले !
दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
जिल्हा परिषदच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन तिन ते चार महीन्यापासून नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पगार मागील तीन ते चार महिन्यापासून रडखडल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाहक संताप व्यक्त केला जात आहे. इतके महिने पगार नसल्याने आम्ही जगायचे कसे, मुला बाळांच्या शिक्षणाच्या, आरोग्य संबंधित समस्याच्या बाबतीत आर्थिक विवेचनात असल्याने कर्मचाऱ्यांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेतन वेळ होत असून, चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्यांना मात्र महिनो महिने पगारापासून वंचित राहावं लागत आहे. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमळत असल्याचे कर्मचाऱ्याकडून बोलले जात आहे. याकडे जिल्हा परिषद च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करण्याची मागणी करत होत आहे.