रा. काँ पा. रा. कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते बेबीताई उईके यांच्या जिल्हा संघटनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुण्यात सत्कार
रा. काँ पा. रा. कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते बेबीताई उईके यांच्या जिल्हा संघटनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुण्यात सत्कार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे येथे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार आदरणीय .सुप्रियाताई सुळे यांच्या अध्क्षतेखाली राष्ट्रीय अध्यक्ष मा. फौज्याताई खान प्रदेशाध्यक्ष . मा. विद्याताई चव्हाण प्रदेश निरीक्षक मा. आशाताई मिरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्रातील सर्व विभागीय अध्यक्ष जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षा शहराध्यक्ष व सर्व तालुकाध्यक्ष यांची आढावा बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी सदर बैठकीस उपस्थित राहून चंद्रपूर जिल्ह्य राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा तालुका निहाय वर्षभरात केलेल्या कामाचा आढावा दिला.आदरणीय.सुप्रियाताई सुळे supriyasule मा.फौजियाताई खान मा.विद्याताई चव्हान मा.डॉ आशाताई मिरगे याना आढावा दिला. चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महीला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी जिल्ह्यात तालुका पातळीवर कार्यकारणी गठीत करुन महीला संघटना मजबूत केली. पक्षात छान कार्य केले. व जनजागर यात्रा चंद्रपूर जिल्ह्यात यशस्वी केली . त्यांच्या कार्याचे कौतुक करत.राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार आदरणीय. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते चंद्रपूर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा. फौजिया खान प्रदेशाध्यक्ष मा. विद्याताई चव्हान राज्य निरिक्षक मा . डॉ. आशाताई मिरगे विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम राज्यभरातील विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष उपस्थित होते.