मनपाने केली चांगल्या कामाची दिवाळखोरी !




मनपाने केली चांगल्या कामाची दिवाळखोरी !

जुने चांगले गट्टू काढून नवीन गट्टूची बोरवण !


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंमनपात मागील एक दीड वर्षापासून प्रशासन राज
सुरू आहे. येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. शहरात अनेक वार्डात विविध कामाच्या योजनेतून कामे सुरू आहेत. अशाच प्रकारचे काम महाकाली मंदिर समोरील मुख्य रस्त्यावर गट्टू लावण्याचे काम सुरू आहे.जुने चांगले गट्टू काढून नवीन गट्टूची बोरवण करणे सुरू आहे.
मात्र इथे अगोदरच काही वर्षांपूर्वी गट्टू लावले गेले होते. तर काही ठिकाणी गट्टू लावण्यात आले नव्हते. परंतु ज्या ठिकाणी आवश्यकता नसतानाही सरसकट नवीन गट्टू लावण्याचे काम मनपा प्रशासनाकडून सुरू असून मनपाने चांगल्या कामाची दिवाळखोरीच केली असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मनपाच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक ठिकाणी कामाचे तीन तेरा दिसून येत आहेत. चंद्रपूर शहरातील अमृत योजना असफल झाल्याची नागरिकात चर्चा आहे. अजूनही अमृतचे थेंब पाणी काही वार्डात मिळेना झाले आहे. , सफाई कंत्राट, पाण्याची समस्या, वार्डातील नाल्यांची साफसफाई, यामुळे शहरातील नागरिक चांगलेच कंटाळले आहेत.



मनपा प्रशासनात आयुक्त विपिन पालीवाल आले तेव्हापासून कामाला काही प्रमाणात सुगीचे दिवस आले. आयुक्त अनेक ठिकाणी स्वतः जातीने लक्ष देऊन कामे करून घेतली. मात्र मनपात प्रशासन राज सुरू झाले केव्हापासून अधिकारी, कर्मचारी यांना चांगले सुगीचे दिवस आले असे म्हटले तर वावगे काय?