पक्षश्रेष्ठींचा आदेश धुडकावुन पटोलेनी
पक्षात स्वतःचा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न ?
दिनचर्या न्यूज प्रतिनिधी
नागपूर : चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदमुक्त करताना पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची अवहेलना केल्याचा आरोप पक्षाच्याच काही कार्यकर्त्यांनी केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्ष संघटनेत स्वतःचा दबदबा निर्माण करण्याच्या प्रयत्नात पक्षातील लोकशाही मूल्यांकडे डोळेझाक केली आहे. सोबतच त्यांनी या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस पक्षात ज्या कुणावर कारवाई केली जाते, आधी त्याची बाजू ऐकून घेतली जाते. त्यासाठी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. त्यानंतर शिस्तपालन समिती योग्य तो निर्णय घेत असते. परंतु देवतळे यांच्या प्रकरणात या प्रक्रियेचे पालन झालेले नाही. प्रदेशाध्यक्षांनी त्यांना थेट पदमुक्त केले. ही बाब काँग्रेस थेट पदमुक्त केले. ही बाब काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या लक्षात आल्यानंतर या पदमुक्तीला स्थगिती देण्यात आली. परंतु या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आता होत आहे.
आक्षेप काय?
जिल्हाध्यक्षांना पदमुक्त करण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांना नाही. ज्याच्या विरोधात तक्रार आहे त्याला शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस पाठवून आधी त्याची बाजू समजून घेणे अपेक्षित आहे. ज्या कारणांसाठी प्रकाश देवतळे यांच्यावर कारवाई केली तसेच प्रकार राज्यातील अनेक जिल्ह्यात घडले आहेत. पटोले यांच्या गृहजिल्ह्यात भंडारा आणि साकोली येथे असा प्रकार घडला आहे. पक्षश्रेष्ठींनी या बाबींकडे लक्ष द्यावे, अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (पक्ष संघटन व कार्यकर्त्यांनी केली आहे.
वेणुगोपाल यांनी पटोले यांना २९ मे रोजी पत्र पाठवले व देवतळे यांना पदमुक्त करण्यास स्थगिती दिली.
लोकसभा निवडणुकीसाठी सक्षम जिल्हाध्यक्ष नेमणे आवश्यक होते. आमदार सुभाष धोटे यांना प्रभारी म्हणून नियुक्तीचे पत्र २९ मे २०२३ रोजी सकाळी देण्यात आले. त्याच दिवशी दुपारी पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांचे पत्र प्राप्त झाले. यावर नंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेणुगोपाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर हा विषय तेथेच संपला.
परंतु पटोले यांनी त्याच दिवशी आमदार सुभाष धोटे यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केले. या बाबी पक्षसंघटनेतील प्रक्रियेला धरून नाहीत. पक्ष चालवताना एकांगी विचार करून चालत नाही, या बाबीचा विसर प्रदेशाध्यक्षांना झाला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रदेशाध्यक्षांचे अशाप्रकारचे वर्तन पक्षासाठी लाभदायी नाही, असेही या कार्यकत्यांचे म्हणणे आहे.