समृद्धी महामार्गावर खाजगी बसला भिषण आग, आगीत 25 नागरिकांचा होरपळून मृत्यू





समृद्धी महामार्गावर खाजगी बसला भिषण आग, आगीत 25 नागरिकांचा होरपळून मृत्यू

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
*लक्षवेध*
*तातडीचे /महत्त्वाचे*

आज दिनांक १ जुलै २०२३ रोजी नागपूर वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स(MH २९ BE १८१९) या खाजगी बसचा मौज पिंपळखुटा,तहसील सिंदखेड राजा,जिल्हा बुलढाणा येथे २ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर अपघात झाला असून सदर बसमध्ये नागपूर जिल्ह्यातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली. या बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी
*जिल्हा नियंत्रण कक्ष* (0712-2562668)
अथवा
*अंकुश गावंडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी* (8860018817) यांच्यांशी संपर्क साधावा ,असे आवाहन नागपुर जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नागपुरवरुन मुंबईच्या दिशेने प्रवासी घेऊन निघालेली खाजगी बसला रात्रो दोनच्या सुमारास भिषण अपघात झाल्याने बसला आग लागली.
रात्री उशिरा प्रवासी बसचा भीषण रस्ता अपघात झाला. 32 प्रवासी घेऊन जाणारी प्रवासी बस दुभाजकाला धडकल्यानंतर पलटी झाल्याने आग लागली. आतापर्यंत 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर वरून पुण्याला ही बस लग्नाची वरात घेऊन निघाली होती. तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. बस दुभाजकाला धडकल्याने पलटी झाली बसची डिझेल टॅंक फुटली आणि बसला आग लागली. हा अपघात रात्री २ वाजताचा सुमारास झाला.या अपघातात 25 प्रवासांचा मृत्यू झाला. डेप्युटी एसपी बाबुराव महामुनी यांनी सांगितले की, बुलढाणा येथील समृद्धी महामार्ग द्रुतगती मार्गावर हा