चंद्रपूर पंचायत समिती नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत! चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री गांभीर्याने घेतील का? पार्किंग नसल्याने नागरिक आवारातच गाड्या ठेवतात! chandrapur Panchayt Samiti

चंद्रपूर पंचायत समिती नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत!

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री गांभीर्याने घेतील का?

पार्किंग नसल्याने नागरिक आवारातच गाड्या ठेवतात!


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात सर्वीकडे शासकीय प्रशासकीय नवीन इमारतीचे बांधकाम मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाला हातभार लावण्याचे सर्वीकडे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यांच्याकडून ते होतही आहे. परंतु अनेक वर्षापासून मोडकळीस आलेली चंद्रपूर पंचायत समितीची इमारत थोड्या पावसातही टपकत असून अनेक वर्षापासून शानसन होऊन असलेली इमारत आजही नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत वाट पाहत आहे.
पंचायत समितीच्या परिसरात फार जुनी इमारत असून या इमारतीत अनेक वर्षापासून पंचायत समितीचा कार्यभार सुरू आहे. शासनाकडून ती अनेकदा नवीन बनवण्यासाठी ठराव गेले असून, अजूनही ती जिल्हा प्रशासन कडून पूर्णत्वास आली नाही.
या पंचायत समितीच्या कार्यालयात जवळपास 40 चाळीस गावाच्या ग्रामपंचायतीचा संपर्क रोज येत असतो. इथे येणारा नागरिकांना वाहन ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नसल्याने ते पंचायत समितीच्या आवारातच आपले वाहन उभे करतात. मात्र यामुळे
प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलीच अडचण निर्माण होत असते. त्यांचे स्वतःचे वाहनही इथे ठेवण्यास जागाही उपलब्ध नसते. म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने घेऊन चंद्रपूर पंचायत समितीची नवीन इमारत तयार करून परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था करावी अशी मागणी सर्वीकडून होत आहे .