ती पार्लर मध्ये आली , मैत्री झाली आणि फसविलेती पार्लर मध्ये आली , मैत्री झाली आणि फसविले

फसवूणक प्रकरणातून निर्दोष मुक्त झालेल्या महिलेची माहिती


दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर : दामदुप्पटीचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात तुकूम येथील कांचन रामटेके या महिलेसह सुजाता बाकडे आणि तिचा पती उमाकांत बाकडे या तिघांना २०२१ मध्ये अटक करण्यात आली होती. याप्रकरणात काचन रामटेके यांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष सुटका केली असून, या फसवणुकीच्या प्रकरणात सुजाता बाकडे या महिलेने मुद्दामहून फसविल्याचे कांचन रामटेके यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी सांगितले.
सुजाता बाकडे ही काही दिवसत तुकूम परिसरात वास्तव्यास होती. माझा ब्युटीपार्लरचा व्यवसाय असल्याने ती ब्युटीपार्लरमध्ये येत होती. नियमित येत असल्याने ओळख झाली आणि मैत्री झाली. याचदरम्यान, तिने माझ्याकडून पैसे उसणे घेतले. एका बचत गटातून व्याजाने तिला पैसे मिळवून दिले. मैत्रीण या नात्याने स्वत:कडील सोनसाखळीसुद्धा दिला. परंतु, नंतर तिने पैसे देण्यास नकार दिला. माझ्यासह अनेक महिलांची तिने फसवणूक केली. मला हा प्रकार कळल्यानंतर तिच्या नवऱ्याकडे याबाबत जाब विचारला. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर काही महिलांनी तिच्याविरोधात दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावेळी पैस मागितल्याच्या रागातून तिने माझे नाव पुढे केल्याने दुर्गापूर पोलिसात सुजाता बाकडे दाम्पत्यासह माझ्यावरही गुन्हा दाखल झाला. काही दिवस अटकेत राहिल्यानंतर जामिनावर सुटका झाली. त्यानंतर प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत होते. त्यामुळे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली. प्रकरणामुळे नाहक बदनामी झाली असून, मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे कांचनने सांगितले. सुजाता बाकडे या दाम्पत्याचा महिलांना फसवणुकीचा धंदा असून, विविध शहरात जाऊन काही वर्ष वास्तव्य करून ओळखी वाढवायची आणि नंतर दामदुप्पटीचे आमिष दाखवून फसवणूक करायचे असा त्यांचा धदा असल्याचे कांचन रामटेके या महिलेने पत्रकार परिषदेत सांगितले. हिंगणघाट व अन्य जिल्ह्यातही सुजातावर गुन्हे दाखल असल्याचा संशय कांचनने व्यक्त केला आहे.

अखेर या प्रकरणात न्यायालयाने न्याय दिला असून, निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र, यादरम्यानच्या काळात झालेली बदनामी भरून निघणारी नसल्याचे तिने सांगितले.