राज्यात बंदी असलेले चोर बीटी बियाणे पोलीस पाटलाकडे सापडले ,कृषी अधिकाऱ्यांची मोठी कारवाई!
राज्यात बंदी असलेले चोर बीटी बियाणे पोलीस पाटलाकडे सापडले ,कृषी अधिकाऱ्यांची मोठी कारवाई!

दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर:-
जिल्ह्यात उशिरा पावसामुळे सगळीकडे कापूस बियाणे टिपण्याचे काम सुरू आहे. राज्यात चोर बीटी बियाण्यावर बंदी असताना तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात या चोरबीटी बियाण्याची सर्रास उलाढाल होत आहे. शेतकऱ्यावर डबल पेरणीचे आर्थिक बोज बसत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी स्वस्त दरात मिळत असल्याने चोर बीटी बियाणे उपलब्ध करून पेरले जात आहे.
राज्यात बंदी असलेल्या कापसाचे बियाणे जिल्हातील हजारो शेतकऱ्यांनी पेरले. त्यातील शेकडो शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगविलेच नाही. त्यामुळे हा प्रकार उघडकिस आला. बंदीचे बियाणे विक्री करणाऱ्यांना प्रशासनाचे पाठबळ असल्याचा प्रकार जिल्हात उघडकीस आला. गावात होणाऱ्या चोर धंद्याची माहिती देण्याची जवाबदारी ज्या पोलीस पाटलाकडे असते त्याच महिला पोलीस पाटील आणि त्याचा मुलाला कृषी विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे बंदी असलेले चोर बीटी ही कापसाचे बियाणे आढळून आले. ही कार्यवाही जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावातील शेतशिवारात करण्यात आली.तेलंगनाचा सीमेवर असलेलं गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर हे छोटेसे गाव आहे, या गावातून राज्यात बंदी असलेलं कपाशीच चोर बीटी बियाणे मोठ्या प्रमाणात विकलं गेलं. कृषी विभागाने दहा दिवसापूर्वी गावात धाड टाकली होती. मात्र विभागाचा हाती काही सापडलं नाही. अश्यात आज एका शेतात चोर बीटी बियाणे असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. माहिती मिळताच कृषी अधिकाऱ्यांनी सकमूर मार्गांवरील जक्कुलवार त्यांचे शेत गाठले. साडेतीन किलो बंदी असलेले बियाणे सकमूर गावातील महिला पोलीस पाटील भाग्यश्री महेश मुत्तमवार यांच्याकडे आढळून आले. पोलीस पाटलाकडेच बंदीचे बियाणे आढळून आल्याने कृषी विभागालाही धक्का बसला, शेतात कपासी तिबत असतानाच तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे यांनी थेट शेतात जाऊन ही कार्यवाही केली. पानसरे यांनी एका महिन्यात तीन कारवाही केल्या आहेत.