पिपरी (धानोरा) येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रंगरावजी पवार यांची निवड





पिपरी (धानोरा) येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रंगरावजी पवार यांची निवड


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पिपरी ग्रामपंचायत येथे झालेल्या ग्रामसभेमध्ये सरपंच सौ वैशाली माथने यांचे अध्यक्षते खाली तंटामुक्त अध्यक्षाची निवड करण्यासाठी श्री रंगरावजी पवार श्री संतोष बापूराव मते व श्री बाळा टाले या उमेदवारांची नावे देण्यात आली मात्र बाळ टाले यांनी निवडणुकीतून माघार घेतली. निवडणूक चुरशीची ठरली असता रंगरावजी पवार यांना 94 मते मिळाली व संतोष मते यांना 31 मते मिळाली रंगरावजी पवार यांनी संतोष मते यांचा पराभव करून तिसऱ्यांदा विजय मिळवला रंगराव पवार यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात आले .सभेला उपस्थित गणेशजी आवारी सदस्य/ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, पारस पिंपळकर सदस्य/ संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, हरी ओम पोटवडे उपसरपंच, भुवन चिने सदस्य , मायाताई मुसळे ज्योतीताई पिंपळकर वर्षाताईं निब्रड, श्री अतुल मोहितकर उपाध्यक्ष सेवा सहकारी पिंपरी बाळा टाले व सर्व संचालक सेवा सहकारी पिपरी तसेच पिपरी येथील तरुण मंडळी व समस्त ग्राम वासियांनी रंगरावजी पवार यांचे अभिनंदन केले