मनसेचे दोन्ही अध्यक्ष रेतीचोर -पत्रकार परिषदेत आरोप भरत गुप्ता आणि प्रतिमा ठाकूर यांचा मनसेला रामराम! chandrapur mns
मनसेचे दोन्ही अध्यक्ष रेतीचोर -पत्रकार परिषदेत आरोप
भरत गुप्ता आणि प्रतिमा ठाकूर यांचा मनसेला रामराम!

हे शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत का- मनदीप रोडे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मागील 17 वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आम्ही इमाने इकबारीने आपले पक्षाचे काम करीत होतो. परंतु पक्षातील काही लोकांना समोर जावं नाही. यासाठी पक्षातील काही नेत्यांनी आमचे खच्चीकरण करण्यासाठी सडबुद्धीने हे सर्व घडून आणल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेतून भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर यांनी केला आहे.
 मागील वर्षी सन्माननीय पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आल्यानंतर चंद्रपुरात नेतृत्व बदल करण्यात आली. युवा नेतृत्व देण्यात आले. महिला सेनेच्या शहराध्यक्षपदी प्रतिमा ठाकूर यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. दोन्ही नवनियुक्त जिल्हाध्यक्ष   मनदीप रोडे आणि राहुल बालमवार  यांनी कधीही महिला जिल्हाध्यक्षांना मान दिला नाही. जिल्हात  सोबत दौरा केला नाही. यासोबतच वाहतूक  सेनेचे जिल्हा अध्यक्ष भरत गुप्ता यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते. परंतु ते सत्य असे आहे की, जिल्ह्यात सेनेच्या  अनेक वीक असताना कुठल्याही जिल्हाध्येक्षाने पक्षाची बांधणी केली नाही.  मग फक्त वाहतूक जिल्हाध्यक्ष यांनाच का टार्गेट करण्यात आले. सरळ सरळ भरत गुप्ता यांना पक्षातून खच्चीकरण करण्याचे काम दोन्ही अध्यक्षांनी केले. म्हणून मनसेला  सोडचिट्टी देऊन  शिंदे गटातील शिवसेना नेत्या नीलम ताई गोरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच  महिला सेना, वाहतूक सेना या पदाधिकाऱ्यांचे 60 70 कार्यकर्त्यासह शिवसेनेत प्रवेश केला आहे.
 
 यावेळी पत्रकार परिषदेत प्रतिमा ठाकूर, भरत गुप्ता, माया मेश्राम, श्रेयस ठाकूर , सौ. कृष्णा सुरमवार,  सौ. बानी सादणकर, राकेश यांची उपस्थिती होती

 हे शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत का- मनदीप रोडे
 आम्ही रेतीचोर आहोत हे ठरवणारे शासकीय प्रशासकीय अधिकारी आहेत का? आम्ही कोण आहोत  ते शासन प्रशासन ठरवतील. इतके मोठे नेते नाहीत की त्यांना आम्ही उत्तर द्यावं. ते पोस्टर नेते आहेत.  कृती नेते नाहीत.
 व्यवसाय हा राजकीय नसून, धंदा हा वैयक्तिक व्यवसाय असतो राजकारणाशी याचा संबंध नाही. म्हणून प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे यासाठी प्रतिमा  ठाकूर आणि भरत गुप्ता एवढे मोठे नेते नाहीत. असे मत मनसे  चंद्रपूर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी मांडले.