चंद्रपुरातही नांदेडची पूर्णावृत्ती होण्याची वाट पाहतो का, सरकार - डॉ. अभिलाषा गावतुरे

चंद्रपुरातही नांदेडची पूर्णावृत्ती होण्याची वाट पाहतो का, सरकार - डॉ. अभिलाषा गावतुरे


आरोग्य मंत्र्यानी जबाबदारी घेत त्वरीत राजीनामा द्यावा... 

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नांदेड येथे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात मृत्यूचे तांडव घडले, आणि राज्यभरात आरोग्य विभागात चांगलीच खळबळ माजली. या घटनेला जबाबदार कोण? असा प्रश्न आता राज्यभरात उमटत आहे.
चंद्रपूर येथील मेडिकल कॉलेज मध्ये बहुजन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने महाविद्यालयाच्या डीनला भेटून चंद्रपूर मेडिकल कॉलेजची दयनीय अवस्था किती बिकट आहे .या संदर्भात श्रमिक पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन डॉ. अभिलाषा गावतुरे म्हणाल्या की, चंद्रपुरातही नांदेडची पूर्णवृत्ति होण्याची वाट पाहतो का सरकार ! चंद्रपुरातील शासकीय रुग्णालय अनेक समस्याचे माहेर घर बनले आहे. रुग्णालयात आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या आणि डॉक्टर इतर कर्मचाऱ्यांच्या जागा खूप मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. एकूण संपूर्ण शासकीय आरोग्यवस्था कोलमोडली असून देशातील केंद्र सरकार आणि राज्यातील राज्य सरकार यांना गुमराम करणारे प्रशासकीय अधिकारी आहेत. आरोग्य विभागात सरकारकडून जनतेच्या स्वास्थ बद्दलची अनास्था कारणीभूत आहे. एखादी घटना घडल्यास केवळ इलाज करणाऱ्या डॉक्टरांना जबाबदार धरून, कारवाई करण्यात येते. मात्र सरकार आपली बला आरोग्य यंत्रणावर ढकलून सर्रास मोकळी होतात. आरोग्यावर होणाऱ्या कमीत कमी बजेट पासून आरोग्य व्यवस्थेचे कंत्राटीकरण किंवा मनुष्यबळाची प्रत्येक ठिकाणी कमतरता जसे की डॉक्टर, नर्स, स्वच्छता कामगार, आरोग्य विभागात राग लागणाऱ्या विविध मशीनची कमी आणि त्यासाठी व्यवस्था घेत असलेली वेळ या सर्व बाबी कारणीभूत आहेत. शासकीय रुग्णालयात तोकड्या संसाधनांमध्ये दवाखाना चालवणे तारेवरची कसरत जरी असली तरी तिथल्या अधिष्ठनाची किंवा दवाखान्याच्या प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यापेक्षाही मोठी जबाबदारी ज्या लोकांना तोकड्या मनुष्यबळाची पूर्तता करण्याची जबाबदारी या सरकारवर आहे. फंड उपलब्ध करून देण्यापासून, औषधाचा पुरवठा करण्यापर्यंत सरकारची भूमिका असली पाहिजे. परंतु तसे न होता सर्व खापर डॉक्टरांवर फोडल्या जाते.          
म्हणून बहुजन मेडिकल असोसिएशन च्या वतीने नांदेड रुग्णालयात झालेल्या या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करत आहे. पण सोबत येतील डिन डॉ. वाकोडे  यांच्यासोबत स्थानिक खासदार हेमंत पाटील यांनी जे गुणस्पद कृत्य केलं त्या वागणुकीचा जाहीर निषेध करतो आहे .
म्हणून आरोग्य मंत्र्यानी जबाबदारी घेत राजीनामा द्यावा. खासदार हेमत पाटील यांच्या वर एँटाँसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा. अशा मागण्या करण्यात आल्या. 
     शासनाच्या आरोग्य शिक्षण किंवा सार्वजनिक स्वास्थ्य व्यवस्था, हापकिन इन्स्टिट्यूट डॉक्टर बनवतात इथे आयएएस अधिकारी  बनवण्यात येतात. ज्यांना आरोग्य व्यवस्थेचा पुरेशा ज्ञान नाही. नाहीतर दयनीय अवस्था झाली नसती विभागातील 24 पैकी 21 संचालकांच्या जागा रिक्त आहेत. मेडिकल कॉलेजमध्ये  प्राध्यापकांच्या आणि सक्षम शिक्षकाच्या 50% च्या जवळपास जागा खाली आहेत. त्यांना  इंटरस्  द्यायला पगार नाही. फक्त आश्वासन दिले जाते. नर्सिंग स्टॉप 70 टक्के पेक्षा कमी आहे. महाविद्यालयातील पीजी टीचर ची संख्या अपुरी असल्यामुळे पोस्ट ग्रॅड शीट मिळत नाही. सफाई  कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. डिनच्या आकड्यानुसार 190 सफाई कर्मचाऱ्यापैकी एकही नियुक्ती मेडिकल कॉलेजात झाली नाही. एका राजकीय हस्तक्षेपाने विचारायची वाट लावली गेली असाही आरोप केला. शासकीय रुग्णालयात 350   नर्सच्या जागा आहेत. सध्या 90 नर्स या रुग्णालयात काम करत आहेत. हीच अवस्था संपूर्ण ग्रामीण आरोग्यवस्थेत   ढबघाइस गेली आहे.
 मेडिकल कॉलेजची बिल्डिंग सुरू होऊन इतकी वर्षे झाली परंतु त्याची पूर्तता अजूनही झालेली नाही. बेड पुरे आहेत, पेशंटला खाली झोपावे लागते. ऑपरेशन एक्स-रे मशीन चार महिन्यापासून बंद आहे. औषधी साठा नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून औषध आणावा लागतो. म्हणून येथील रुग्णांना  खाजगी रुग्णालयामध्ये पाठवण्यात येतात. वैद्यकीय महाविद्यालयात सर्वीकडे घाणीच्या साम्राज्य पसरलेला आहे. एकंदरीत राज्याची आरोग्यवस्थाच बीमार आणि आयसीयू मध्ये ऍडमिट आहे. असा प्रकार सर्रास राज्य  राज्यात सुरू आहे.
 सध्या आरोग्य विभागात नव्हे तर राज्यात राजकारणाचे कंत्राटीकरण झाल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे. यावेळी डॉक्टर अभिलाषा गावतुरे, डॉक्टर स्नेहल खोब्रागडे, डॉक्टर तातावार, डॉक्टर  राकेश गावतुरे , यास संघटनेचे इतर डॉक्टर यांची उपस्थिती होती.