चंद्रपुरातील हजारो विद्यार्थी सरकारच्या खाजगीकरणा विरोधात उतरले रस्त्यावर !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरात जिल्हा अधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शासनाच्या खाजगीकरणाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. त्याचे पडसाद आज चंद्रपुरात निघालेल्या जन आक्रोश मोर्चातून दिसून आले आहे. आज हजारो से युवा ,शालेय विद्यार्थी , रस्त्यावर उतरून सरकारच्या कंत्राटीकरण पद्धती बंद करावे. शासकीय नोकऱ्याचे खाजगीकरण करू नये, जिल्हा परिषद च्या शाळेचे खाजगीकरण करू नये, तसेच अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावे. या मागण्यासह अन्य प्रलंबित मागण्याच्या अनुषंगाने शिक्षण व नोकरी बचाव समिती चंद्रपूर यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून जलो आक्रोश मोर्चा हजारोच्या संख्येने काढण्यात आला. हा मोर्चा जटपुरा गेट गांधी चौक गिरनार चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोच्या संख्येने धडकला.
उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाने शासन निर्णय 6 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केला. त्यानुसार शिक्षण व विविध विभागात मनुष्यबळ बाह्य यंत्रणेमार्फत पुरवण्यात येणार आहे. शासकीय नोकरी हा महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांचा हक्क आहे. बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती करून सुशिक्षित बेरोजगारांचे शोषण करण्याचे काम सरकारने केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन, सरकारने आता तरी जागे व्हावे, खाजगीकरण रद्द करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी , जिल्हा परिषद शाळा अस्तित्वात राहिल्या पाहिजे एवढेच नाही तर राज्य सरकारच्या विरोधात विविध प्रकारचे नारेबाजी करून सरकारला जागवण्याची घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांचा पाठिंबा होता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या व शासकीय कर्मचारी, शिक्षक यांच्या प्रामुख्याने सहभाग होता. या मोर्चात राजकीय क्षेत्रातील आमदार प्रतिभा धानोरकर, शिक्षक विधान परिषदेचे आमदार सुधाकर अडबाले, आमदार वंजारी,डॉ. अभिलाषा गावतुरे, शिवानी वडेट्टीवार, यांची उपस्थिती होती.