महिलांना स्वयंरोजगार आणि ग्रामीण पर्यटकांना चालना देणारे संकुलन ठरेल - ना. सुधीर मुनगंटीवार





महिलांना स्वयंरोजगार आणि ग्रामीण पर्यटकांना चालना देणारे संकुलन ठरेल - ना. सुधीर मुनगंटीवार

वैभव लक्ष्मी समूह संचालित रायबा रिसॉर्ट पर्यटन संकुलाचे नूतनीकरण लोकार्पण सोहळा

दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर, 23 ऑक्टोबर 2023: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत चंद्रपूर तालुका ग्रामपंचायत कोळसा अंतर्गत झरी येथे वैभव लक्ष्मी समूह संचालित रायबा रिसॉर्ट पर्यटन संकुलाच्या इमारत बांधकामाचे नूतनीकरण लोकार्पण सोहळा मा.ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंत्री वने सांस्कृतिक कार्य व मत्स व्यवसाय (महाराष्ट्र राज्य) तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या शुभहस्ते पार पडला.
या कार्यक्रमात बोलताना, मा.ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी म्हटले की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमतेसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याचबरोबर, ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. रायबा रिसॉर्ट पर्यटन संकुलाचे नूतनीकरण झाल्यामुळे, येथील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आणि ग्रामीण पर्यटनालाही चालना मिळेल, ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला दिशा देणारे संकुलन ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी मा.श्री. विनय गौडा, जि. सी. जिल्हाधिकारी चंद्रपूर, मा.श्री.विवेक जॉन्सन, मुख्यकार्यकारी अधिकारी जि .प. चंद्रपूर, मा.श्री विजय पवार, तहसीलदार चंद्रपूर,मा.आशुतोष सपकाळ, गट विकास अधिकारी प.स.चंद्रपूर, मा.श्री विनोद खापणे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) जि. प.चंद्रपूर,मा.श्री प्रकाश कारेगौडा, उपविभागीय अभियंता (बांधकाम )उपविभाग चंद्रपूर, मा. श्री वाकडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, जिल्हा परिषद चंद्रपूर, मा. शितल देरकर, तालुका अभियान व्यवस्थापक,पंचायत समिती चंद्रपूर,मा. सरपंच ताई, मा. उपसरपंच, विस्तार अधिकारी (प.),पंचायत समिती कार्यालय चे कर्मचारी, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर तील सर्व कर्मचारी, प.स.चंद्रपूर तालुक्यातील सर्व सन्माननीय सरपंच मंडळी, तालुक्यातील सर्व ग्रा.प. सचिव, ग्रा.प. सदस्य, सर्व व ग्रामस्थ व मोठ्या प्रमाणात महिल्या उपस्थित होत्या.