मनपाच्या झोन नंबर तीन मध्ये नागरिकासह कर्मचाऱ्यांची पाण्याविना कुचंबना



मनपाच्या झोन नंबर तीन मध्ये नागरिकासह कर्मचाऱ्यांची पाण्याविना कुचंबना

आठ दिवसापासून पाणी नसल्याने वॉशरूमलाई बाहेर जावे लागते


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरामध्ये सध्या महानगरपालिकेकडून चंद्रपूर शहराच्या सौंदर्यकरणासाठी लाखो रुपयाचे काम सुरू आहेत. माननीय आयुक्त साहेबांनी स्वच्छतेसाठी चंद्रपूर शहरासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या कामाचा सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. त्यांचे काम अभिनंदनस्पद आहेत.
मात्र चंद्रपूर शहरातील मनपा अंतर्गत येत असलेल्या बंगाली कॅम्प परिसरातील झोन नंबर तीन मध्ये अतिशय दयनीय परिस्थिती असल्याने मागील आठ दिवसापासून पाण्याची कुठलीही सुविधा नसल्याने नागरिकासह कर्मचाऱ्यात कुचंबना सुरू आहे.
साधं वॉशरूमला जायचं म्हटल्यास कर्मचाऱ्यांना बाहेर जावं लागत आहे. मात्र येथील झोन अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना पाणी का नाही या संदर्भात विचारले असता पाण्याची मोटर दुरुस्तीला दिल्याचे सांगत आहेत. मनपा प्रशासनात अशा प्रकारची दिरंगाई होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना खरच पाणी मिळत असेल का हाही प्रश्न नागरिकात उपस्थित होत आहे. पिण्याच्या पाण्याची टाकी सुद्धा अतिशय घाण असून तेथील पाणी पिण्यायोग्य नसल्याचेही बोलले जात आहे. दोन दिवसा अगोदरच मनपाच्या टँकरनी पाणी आणून टाकी मध्ये पाणीभरून नागरिकास कर्मचाऱ्यांना पिण्यास उपल्बध करून देण्यात आले. मात्र त्या टाकीमध्ये पाणी टाकण्यात आले ती टाकी अतिशय घाण युक्त झाल्याचे बोलले जात आहे. याकडे सक्षम अधिकाऱ्याची दुर्लक्ष होत आहेत. जर आपल्याच घरी हा अंधार असेल तर दुसऱ्यांचे काय असा प्रकार आता दिसून लागला आहे. म्हणून याकडे संबंधित मनपा आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष देऊन झोन नंबर तीन मध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.