आशा ड्रायफूट, होम शॉपच्या दुकानाला भीषण आग chandrapur




आशा ड्रायफूट, होम शॉपच्या दुकानाला भीषण आग

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

चंद्रपूर शहरातील मध्य भागात मुख्य मार्गावर असलेल्या वन विभागाच्या कार्यालयासमोर आशा ड्रायफूट आणि होम शॉप च्या दुकानाला भीषण आग लागल्याने या आधीच संपूर्ण दुकानातील साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. पहाटेला मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना संबंधित दुकानातून धूर निघताना दिसल्याने संबंधित मालकांना प्राचारण्यात करण्यात आले. तद्वतच अग्निशामक दलाच्या वाहनांना प्राचारण करण्यात आले असून सकाळपर्यंत आग विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले. मात्र तोपर्यंत ड्रायफूट व होम शॉप मध्ये असलेल्या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.
काँम्प्लेक्स मधिल अनेक दुकाने आगीत वाचण्यात आले.