उद्या वाहनचालकांचा "या"कायद्याविरोधात चक्काजाम
उद्या वाहनचालकांचा "या"कायद्याविरोधात चक्काजाम

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
केंद्र सरकारने वाहन चालकावर लादलेल्या जटिल कायद्याच्या धोरणा विरोधात उद्या दिनांक 2/1/ 2024 ला बंगाली चौक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेतून चंद्रपूर संघर्ष वाहन चालक-मालक संघटना अध्यक्ष विनोद चांदेकर, लाल बावटा वाहन चालक-मालक संघटना प्रकाश रेड्डी, यांनी दिली.
सरकारने हिट अँड रन कायदा आणून वाहन चालकावर फार मोठे गुन्हेगारी प्रवृत्तीचे 302 चे कलम लावून त्यात दहा वर्षाच्या सजेचे प्रबंध व सात लाख रुपये दंडाची तरतूद केली आहे. त्यामुळे सर्व वाहन चालक सत्ताधारी केंद्र सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत असून वाहन चालवताना अपघात अनेक कारणाने होत असतात अशा प्रकारचे कायद्यात बदल करताना सर्वसामान्य वाहन चालकांच्या संघटनांना विश्वासात घेऊन कायदा करणे अपेक्षित असते. परंतु तसे न करता एकाधिकारशाही राबवून विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करून जनतेच्या विरोधात कायदे बनवून पारित करणे तसेच ड्रायव्हर विरोधात पारित केलेला कायदा तात्काळ रद्द करावा अन्यथा संपूर्ण राज्यभर वाहन चालक रस्त्यावर उतरून बेमुदत आंदोलन करतील. त्याची पूर्व सूचना म्हणून चंद्रपुरात उद्या चक्काजाम आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती दिली.
महाराष्ट्रातील उद्योग कारखाने यात चाललेले वाहन त्या वाहनावर चालणारे चालक मोठ्या प्रमाणावर असलेले बेरोजगारी हाताला काम शिल्लक राहिले नाहीत अशातही या सरकारने चालकाल विरोधात नवीन कायदा आणून एक प्रकारचे दडपशाही धोरण अवलंबले असल्याने हा कायदा तुरंत रद्द करावे अशी मागणी घेऊन चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. वेगवेगळ्या संघटनेचे चालक-मालक उपस्थित होते.