मनपाच्या दहा कोटीच्या कामात लोकप्रतिनिधीच्या पी ए चा टक्केवारी वाटा !
मनपाच्या दहा कोटीच्या कामात लोकप्रतिनिधीच्या पी ए चा टक्केवारी वाटा !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरांमध्ये महानगरपालिका अंतर्गत होत असलेल्या लोकप्रतिनिधीच्या निधीतून दहा करोड रुपयांच्या कामाचे ऑफलाइन टेंडर निघाले असून त्यात कार्यकर्त्यांना काम देण्यात यावे असा फर्मान लोकप्रतिनिधी कडून काढण्यात आला. मात्र काही कार्यकर्त्याकडे कागदाची जुळवाजवळ नसल्याने लोकप्रतिनिधीचे दोन पीए दहा पर्सेंट वर आम्हालाच काम द्या असा कार्यकर्त्याकडे तगादा लावल्याने चांगलीच चर्चा होत आहे. संबंधित मनपा कार्यरत असलेल्या जी ई कडे चिठ्ठी पाठवल्या जाते. त्यानुसार त्या कार्यकर्त्यांना मनपा विभागातून कंत्राट मिळत असतो. परंतु लोकप्रतिनिधीचे दोन पिलांटू कमिशन खोरीत कार्यकर्त्याकडून दहा टक्क्यांनी घेऊन. ते बाहेर 15 टक्क्यांनी विकत असल्याची सूत्राची माहिती असून या संदर्भात चांगली चर्चा होत आहे. मात्र या लोकप्रतिनिधी कडे सक्रिय कार्यकर्ते असणाऱ्यांची चांगलीच गोची होत आहे. एखाद्या कार्यकर्ते कंत्राटदाराला समजा अंशी लाखाचे काम भेटले असेल. तर या पीएला दहा% नुसार 80 हजार द्यावे लागते. प्रत्येक कार्यकर्त्याला या दोन पिलांटू कडून चिट्टी मिळाली असते. ती चिठ्ठी संबंधित मनपा कार्यालयातील जी ई.कडे जातो. तो त्या पद्धतीने कंत्राट जाहीर करतो.
यामुळे संबंधित शहरातील कार्यकर्ते उपाशी असून प्रिए मात्र तूपाशी आहेत.
यामुळे या पीएकडे या धाग्यादोऱ्यांची चांगली चर्चा असून धागा एवढा जबरदस्त आहे की लोकप्रतिनिधीच्या डोळ्यावरची पट्टी निघणेही दुर्लभ झाले आहे. आता येणारी 2024 ची निवडणूक पिलान टू मुळे लोकप्रतिनिधींना चांगलीच अडचणीत येणार आहे. आता लोकप्रतिनिधीने आपल्या डोळ्यावरची पट्टी हटवून कार्यकर्ते तुपाशी आणि पीए उपासी झाले पाहिजे याकडे लोकप्रतिनिधीने लक्ष दिले गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या 24 च्या निवडणुकीत कार्यकर्ता नसेल तर त्याचे काय?
कारण लोकप्रतिनिधीचा दुवा हा कार्यकर्ता असतो आणि इथेच या लोकप्रतिनिधीची कडी लावल्या गेली आहे. तूर्तास एवढेच!