बाबूपेठ नेताजी चौकातील नवीन पाण्याच्या टाकीला लागली गळती, हजारो लिटर पाणी वाहते,मनपाचे दुर्लक्ष!




बाबूपेठ नेताजी चौकातील नवीन पाण्याच्या टाकीला लागली गळती, हजारो लिटर पाणी वाहते,मनपाचे दुर्लक्ष!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात अमृत योजनेच्या नावाखाली शहरात पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वार्डात अंदाजे आठ पाण्याच्या टाकी मनपा प्रशासनाकडून बनवण्यात आल्या.
चंद्रपूर मनपा प्रशासन यांनी अमृत योजनेच्या करोडो रुपयांच्या खर्च करून प्रत्येक वार्डात सुलभ पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून हजारो लिटरच्या पाणी टॅंक बनवण्यात आल्या. मात्र निष्कृष्ट दर्जाच्या कामामुळे बनवण्यात आलेल्या पाण्याच्या टॅंक ह्या लिंक झाल्या असून मागील सहा सात महिन्यापासून या टाकीमधून हजारो लिटर पाणी वाहत असते.
हा प्रकार बाबूपेठ येथील नेताजी चौकात अमृत योजनेत खाली नवीन पाण्याची टॅंक बनवण्यात आली. ही टाकी लिकेज असल्याने हजारो लिटर पाणी दिवस रात्र वाहत असते. एकीकडे प्रशासन सर्वसामान्य माणसाच्या घरचा नळ बेवज वाहत असल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याची प्रसार माध्यमातून बातमी प्रसारित करीत आहे. आणि स्वतःच मनपा प्रशासन याकडे गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. सरकारचे आणि प्रशासनाचे पाणी वाचवा, पाणी जिरवा असा उपक्रम एकीकडे केला जातो. दुसरीकडे मात्र मनपा प्रशासनाच्या माध्यमातून हजारो लिटर पाणी व्यर्थ घालवल्या जाते. यामुळे सामान्य नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही.
शहरातील अमृत योजना सक्षम निष्फळ ठरल्याचे बोलले जात आहे. पूर्वी असणाऱ्या नळातून सुलभ पाणीपुरवठा व्हायचा. मात्र आता नवीन पाण्याच्या पाईप लाईन मधून नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याची बोंब नागरिकात होत आहे. म्हणून संबंधित पाण्याच्या टाकीचे लवकरात लवकर लिकेज बंद करून हजारो लिटर पाणी वाहणारे बंद करावे अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. यावर मनपा आयुक्त यांनी गांभीर्याने घेऊन हजारो लिटर पाणी वाहत असलेल्या टाकीला लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी होत आहे.