जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट क्रो- आप सोसायटी संचालक पदी कपबशीने मारली बाजी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्हा परिषद च्या कर्मचारी क्रेडिट को ऑफ सोसायटीच्या निवडणूक दिनांक 7/1/ 2024 ला पार पडली. सोमवारी ला झालेल्या मतगिनतीत माध्यमिक प्राथमिक शिक्षक संघटना समर्पित प्रगती पॅनल चे अधिकृत उमेदवार कप बशी या बोधचिन्हावर नव संचालकांनी बाजी मारली.
यात सर्वसामान्य मतदार गटातील धनराज उपासे कप बशी या बोधचिन्हावर 444 मते घेऊन विजय झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी शंकर भेजेवार यांना 407 मतांवर समाधान मानावे लागले.
महिला राखीव मतदार संघातून गीता खामनकर यांना 393 मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी उमेदवार शिल्पा देवगडे यांना 375 मते मिळाली.
सर्वात चुरशीच्या लढतीत असलेल्या विमुक्त जाती मतदार संघातून रवी पोचमपल्लीवार यांना 422 मते मिळाली असून अतिथटीच्या चुरशीत रवी पोचमपल्लीवार (भजविभा प्र) संघातून विजय झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी ज्ञानेश्वर ढोले यांना 393 तर सुभाष चव्हाण यांना 335 मतावर समाधान मानावे लागले.रवि पोचमंप्पलीवार यांचा 29 मतांनी विजयी झाला.
अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून सुशील मेश्राम यांना 359 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी प्रफुल दहिवले यांना तीनशे तीन मते मिळाली यांचा पराभव झाला.
इतर मागासवर्गीय गटात मतदारसंघातून सुरेश खाडे यांना 354 मते मिळाली तर सचिन मुरकुटे यांना अवघ्या 254 मतावर समाधान मानावे लागले.
या चुरशीच्या लढतीत पूर्वी सत्तेत असलेल्या संचालकांना भूखंड घोटाळा भोगावा लागला अशी चर्चा आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या तालुका निहाय पंचायत समिती मधील वर्ग तीन व चारच्या सभासदांनी मतदान केले होते. यात कपबशी या बोधचिन्हावर प्रगती पॅनल चा घवघवीत हेच संपादन करण्यात ज्या सभासदांनी विजय मिळवण्यासाठी मदत केले त्या सर्वांचे प्रगती पॅनल कडून आभार व्यक्त केले आहे.