लालपेठ जय श्रीराम किडा युवक व व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे खुले कबड्डी सामने

लालपेठ जय श्रीराम किडा युवक व व्यायाम प्रसारक मंडळाद्वारे खुले कबड्डी सामने


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर लालपेठ जुनी वस्ती हनुमान मंदिराच्या पटांगणात दोन वर्षापासून चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून
श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव द्वारा भव्य खुले कबड्डी सामने,लालपेठ जय श्रीराम क्रीडा युवक व व्यायाम प्रसारक मंडळ, चंद्रपूर यांच्या विद्यमाने महिला व पुरुष गटातील कबड्डी सामन्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे यांच्या नेतृत्वात भव्य स्वरूपात होत आहे.
या स्पर्धेकरिता पुरुषांचे 40 टीम तर महिलांच्या 12 टिमा वेगवेगळ्या जिल्ह्यातून , तालुक्यातून, ग्रामीण भागातूनही खेळाडू आले आहेत. त्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था ही मंडळाकडून करण्यात आली आहे.

पुरुष (ब) गट ५७ किलो,एक दिवसीय सामने
शुक्रवार, दि. ०२/२/२०२४ विजेता संघ रू. २५.५५५/- रोख व आकर्षक चषक प्रवेश फी रु.७००/- उपविजेता संघ रू. १५.५५५/- 1000 रोख व आकर्षक चषक
आकर्षक बक्षिस - ५७ किलो,पुरूष (अ) गट ७० किलो
सामने शनिवार व रविवार, दि. ०३ व ०४/२/२०२४ विजेता संघ रू. ३३,३३३/- रोख व आकर्षक चषक उपविजेता संघ रू. २२.२२२/५० रोख व आकर्षक चषक
प्रवेश फी रु. ७००/-
आकर्षक बधिरर ७० किलो हिरो ऑफ द टुर्नामेंट - ३००० रोख बेस्ट रेडर २००० रोख ठेवण्यात आले आहे.
महिला गट खुले सामने शनिवार व रविवार,
दि. ०३ व ०४/२/२०२४ विजेता संघ १५,५५५/- रोख व आकर्षक चषक उपविजेता चषक ११.१११/-
रोख व आकर्षक चषक
आकर्षक बक्षिस,हिरो ऑफ द टुनर्नामेंट - २००० रोख बेस्ट रेडर १००० रोख रक्कम देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियम व अटी: १) सर्व सामने असोशिएशनच्या नियमानुसार राहील. २) नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही. ३) एका खेळाडूस फक्त एकाच संघाकडून खेळता येईल. ४) काही नियम मंडळाने रोखून ठेवले आहे. ५) वजनास सुट दिल्या जाणार नाही. ६) प्रत्येक संघास सकाळी १० वाजेपर्यंत पोहोचणे बंधनकारक राहील. त्यानंतर आलेल्या संघाचा विचार केल्या जाणार नाही. ७) एका खेळाडूचे वजन फक्त दोनदा करण्यात येईल. भोजनाची व राहण्याची सोय मंडळाकडे राहणार. टिप: गटात आयपीएल संघ आढळल्यास संघ बाद करण्यात येईल.
क्रीडा मंडळाची कार्यकारिणी• अध्यक्ष - श्री भास्करराव कावळेउपाध्यक्ष श्री शरदजी बनकर कोषाध्यक्ष श्री उमेश गंडाईत क्रीडा प्रमुख अमोल शेंडे, मोरुभाऊ भरटकर, महेंद्र चहारे, सचिन चन्ने, संदिप गाऊने उपफ्रीडा प्रमुख विनोद बनकर राहूल शेंडे, निलेश चहारे, दिवाकर गाऊने
• सचिव - श्री चंद्रशेखर बनकर सहसचिव श्री कवडू मोहुर्ले,
अतुल बनकर   त्यांच्याकडून कबड्डी स्पर्धेत मोलाचे सहकार्य, नियोजन, व सुव्यवस्था पार पाडली जात आहे. या कबड्डी  सामन्यासाठी नागरिकाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.