सुरजागड येथील हायवाने दोन दुचाकीसह दुचाकीस्वारास चिरडले




सुरजागड येथील हायवाने दोन दुचाकीसह दुचाकीस्वारास चिरडले

तिघांचा जागीच मृत्यू

आक्सापूर मंदिरासमोरील घटना

दिनचर्या न्युज :-
गोंडपिपरी :-दोन दुचाकी गोंडपिपरी वरून चंद्रपूर मार्गे जात असताना विरुद्ध दिशेने चंद्रपूरवरून सुरजागडला लोहखनिज आणण्याकरिता जाणाऱ्या हायवाची दुचाकींना एवढी जबर धडक दिली की जाग्यावरच दुचाकी चालक तिघांचा मृत्यू झाला. दुपारी 12वाजता चंद्रपूर कोठारी मार्गांवरील आक्सापूर येथील मंदिरासमोर MH33 K6739, MH34 AG 3224 या दोन दुचाकींना हायवाने धडक दिली व अपघात घडला. तसेच अपघाताची माहिती मिळताच अनेकांनी एकच गर्दी केली. घटनास्तळी कोठारी व गोंडपिपरी पोलीस दाखल झाले आहेत. मृत्यू झालेल्याचे नाव अजूनपर्यंत कळू शकले नसून पुढील तपास कोठारी व गोंडपिपरी पोलीस करीत आहे. हायवा चालकाने घटनास्तळावरून पसार केला असून चालकाचा शोध सुरु आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोहखनिज संपत्तीच्या कच्च्या मालाची आयात करण्याकरिता हजारो ट्रक गोंडपिपरी पोन्भुर्णा बल्लारशा धाबा या मार्गावरून अहोरात्र धावत असतात. अनेक प्रकारंना ट्रकांना त्याचा साधा नेमप्लेटही दिसून येत नाही. अशा वेळेस छोट्या मोठ्या अपघात झाल्यास हायवा ट्रक अपघात करून सुसाट वेगाने पळ काढतात. याकडे महामार्गाचे पोलीस तर दूर परस्परातील पोलीस स्टेशन सुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे आतापर्यंत शेकडो अपघात सुरजागड येथील लोह खनिज आयात करणाऱ्या हायवा ट्रकांकडून झाले आहेत.