व्हीआयपी पासेस साठी भोजन व्यवस्था पण वन विभागाकडून अपमानास्पद वागणूक !




व्हीआयपी पासेस साठी भोजन व्यवस्था पण वन विभागाकडून अपमानास्पद वागणूक !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात विसापूर
विसापूर येथील श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनचा लोकार्पण सोहळा व श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ व महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल याचा भूमीपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी 12 मार्च रोजी चंद्रपूरातील विसापूर येथे आले होते. यावेळी आलेल्या व्हीआयपी लोकांसाठी, पत्रकारांसाठी पासेस देऊन भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. मात्र वन विभागाच्या गाफील व्यवस्थापनामुळे भोजन व्यवस्थेसाठी आलेल्यांना अपमानास्पद वागणूक,  मुख्य गेटवर अपमान सहन करावा लागला. अनेक नागरिकांनी याचा रोष व्यक्त केला. एवढेच नाही तर या कार्यक्रमात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांना व लहान मुलांना बॉटनिक गार्डन सहल साठी म्हणून आणले होते .परंतु बॉटनिक गार्डन मध्ये प्रवेश न मिळाल्याने त्याने आपली नाराजी व्यक्त करून पुन्हांदा मी कधी या बॉटनिक गार्डनमध्ये पाय सुद्धा ठेवणार नाही असा रोष व्यक्त करून निघून गेल्याची चर्चा आहे.
वन विभागाच्या या व्यवस्थेमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत असतो. यामुळे वन मंत्राच्या विकास पुरुष नावाला, कार्यकर्त्यांनी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगल्या कार्यक्रमाला बदनाम ,डाग लावण्याचा प्रयत्न केलाचे दिसून आले.