पुन्हा एमएसीबीच्या वाढीव बिलाचा जोरात झटका,... त्यात 200 युनिट माफीचे काय ?

पुन्हा एमएसीबीच्या वाढीव बिलाचा जोरात झटका,... त्यात 200 युनिट माफीचे काय ?

आमदार किशोर जोरगेवार यांना भोला मडावी यांचे दुसरे पत्र !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल सुरू आहे. त्यात राज्यातील ऊर्जा मंत्रालयाकडून सर्वसामान्य नागरिकासह सर्वांनाच विद्युत वाढीव बिलाचा फटका सहन करावा लागत आहे. मागील महिन्यापासून नागरिकांना वाढीव बिल, त्यास अतिरिक्त भार म्हणून वाढीव बिल पाठवून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रकार सरकारकडून होत आहे. सरसकट दहा टक्के , अधिभाराचे वाढीव बिल पाठवून भर उन्हाळ्यात सरकारने  सामान्य माणसाची  आर्थिक फसवणूक करण्याचे काम  सुरू आहे.  
 चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरदार चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना 200 युनिट विद्युत  मोफत   मिळण्याच्या  आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी कमी पडत आहेत की काय असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिक  करत आहेत. या संदर्भाचे पत्र समाजकर्ता भोला मळावी यांनी  पुन्हा लोकप्रतिनिधी  लिहिला आहे. ते म्हणतात.
  2019 विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार शब्दाला जागण्याची आज आता नितांत गरज येऊन पडली आहे.त्याचे कारण असे की,जेव्हा आपण 200 युनिटचे आश्वासन दिले तेव्हा घरगुती प्रति युनिटचा दर 5-60 रुपये इतका होता.आता 10-30 रुपये इतका झाला आहे.म्हणजे सरसकट डबल.
   महोदय,आपला 200 युनिटवर दांडगा अभ्यास आहे.त्यामुळे ह्या पत्रातून अधिक सखोल लिहिण्यापेक्षा आपण खुद्द समजदार आहात. शिवाय आता आपली केंद्र व राज्य दोन्ही ठिकाणी घट्ट मैत्री जमल्याचे चित्र सुद्धा नाकारता येत नाही.त्यामुळे आपण अपक्ष व एकटे आहात हा आता तरी प्रश्न उरलेला नाही.त्यामुळे ज्या प्रमुख मागणीच्या बळावर आपण मताधिक्य मिळवीले व विधानसभेत गेलात.म्हणून बाकी सर्व सोळा व एकच लक्ष केंद्रित करा 200 युनिट. 
       अन्यथा आम्हाला  अधिभारासह आलेल्या अधिक बिलाचा त्रास सोसावा लागत असल्याकारणाने आपल्या कार्यालयात आम्हाला आमचे लाईट बिल भरणासाठी पाठवावे लागेल. साहेब तुम्हीच विचार करा बघता बघता साडे चार वर्ष लोटत आहे व पुढे विधानसभा येणार आहे आणी अजूनही हा विषय सुटत नसेल तर चंद्रपूरकर तरी किती काळ शांत बसेल.
       म्हणून ही रास्त मागणी घेऊन आपण मैदानात उतरा आम्ही आपल्या सोबत आहोत.म्हणाल तर रस्त्यावरही उतरू.म्हणाल तर चंद्रपूरचे औषणिक विद्युत केंद्र ही बंद पाडू.कारणं ज्या औषणिक विद्युत केंद्रामुळे आमच्या पर्यावरणावर व आरोग्यावर जो परिणाम होत आहे. त्याचा त्रास आम्ही चंद्रपूरकर भोगत आहोत.बाकी त्या औषणिक विद्युत केंद्राच्या विजेचा लाभ घेत आहे.विज निर्मितीसाठी आमची जागा,आमचे पाणी,आमचा कोळसा सार काही आमचच आणी आम्हाला काहीच लाभ नाही. हे योग्य नाही. हे सर्व तुम्ही जाणता. 
    त्यामुळे ह्या पत्रावर गांभीर्याने विचार करावा.व किमान उन्हाळ्यातील तरी 4 महिन्याच्या बिलाची तूर्तास माफी मंजूर करून द्यावी.ही आग्रही विनंती.