आज पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचा रणसिंग फुकणार



आज पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचा रणसिंग फुकणार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार पहिल्या टप्प्यातील पूर्व विदर्भातून चंद्रपूर जिल्ह्यातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार दौऱ्यातून चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा चंद्रपूर -वनी -आणिँ लोकसभेचे
उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराचा नारळ चंद्रपूर येथून फोडणार आहेत. ते चंद्रपूर येथून रणसिंग पुंकणार असून लाखोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असा दावा केला जात आहे. मोरवा विमानतळजवळील भव्य पटांगणात दुपारी वाजता जाहीर सभा होणार आहे. 

विदर्भातील पहिली सभा घेणार आहे. राज्यात लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चांगलीच रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Leader Sudhir Mungantiwar) यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत.
राजुरा येथे नितीन गडकरी यांच्या झालेल्या सभेत गडकरी म्हणाले की, मुनगंटीवार ना शिलाजीत देऊन सक्षम बनवून लोकसभेत पाठवू.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतून महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकले जाणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभा घेणार येणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेत आहेत.
पंतप्रधान मोदी छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून जनतेला राज्याचे वन, संस्कृती आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहे.
आज विदर्भात पंतप्रधान मोदींची पहिली सभा पार पडणार (PMModi In Chandrapur) आहे. त्यामुळे त्यांच्या या सभेकडेसगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आता पंतप्रधान मोदी स्वतःप्रचाराच्या रिंगणात उतरल्याचं दिसत आहे. इतर सर्व पक्ष देखीलआपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करत आहेत.
सुधीर भाऊंची सरळ लढत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत होत आहे. विकासाचा महामेरू! तर दुसरीकडे लोकशाही आणि सविधान वाचवण्यासाठी धडपड होत असलेल्या दोन उमेदवारात जोरदार प्रचार सुरू आहे. 19 तारखेला होणाऱ्या मतदानात कोण बाजी मारेल! हे मात्र जनता ठरवेल.
तत्परवी प्रत्येक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा मतदानावर किती प्रभाव पडतात. हे दिसून येणार आहे. त्यामुळे यावेळी होणाऱ्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागले आहेत.