सलाम किसान, मुंबई व रघुकुल आयुर्वेदिक हॉस्पिटल भिसी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर




सलाम किसान, मुंबई व रघुकुल आयुर्वेदिक हॉस्पिटल भिसी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर


दिनचर्या न्युज :-
भिसी:
सलाम किसान प्रा. लि. मुंबई व रघुकुल आयुर्वेदिक हॉस्पिटल भिसी यांच्या संयुक्त विद्यमाने "एकनाथी भागवत सप्ताह" निमित्त भिसी येथे दिनांक ६ एप्रिल, २०२४ रोजी मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमास भिसी नगरीत येणाऱ्या भावी भक्तांचा अतिउस्फुर्त असा प्रतिसाद लाभला. त्यात मुख्यतः सलाम किसान टीम यांचा स्टाफ स्टॉल वर येणाऱ्यांना शेती तांत्रिकीकरणाचे, ड्रोन फवारणीचे व माती परीक्षण सारख्या अति महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करत होते व मोफत नोंदणी करत होते. याव्यतिरिक्त प्रत्यक्ष ड्रोन व मृदा परीक्षण किट दाखवण्यासाठी व समजवून देण्यासाठी स्टॉलवर उपलब्ध होते. सोबतच आरोग्य शिबिरामध्ये रघुकुल हॉस्पिटल भिसी यांचा स्टाफ निशुल्लक सेवेस उपलब्ध होते. त्यामध्ये येणाऱ्या व्यक्तीस योग्य तो निदान करून देण्यास त्यांचा भर होता. या टीम मध्ये तीन डॉक्टर, एक नर्स, एक कर्मचारी असा स्टाफ उपस्थित होता. सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी यांकडून त्यांचे कर्मचारी येथे सेवा देण्यास उपलब्ध होते.

सकाळी ९ वाजता पासुन वरील संयुक्त उपक्रमाची सुरुवात करण्यात स्टॉल मध्ये करण्यात आली होती. हा स्टॉल अगदी "विठ्ठ्ल रुख्माई देवस्थान" च्या अगदी समोरच्या बाजूने लावण्यात आलेला होता जेणे करून याचा लाभ "एकनाथी भागवत सप्ताह" साठी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकास मिळू शकेल. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असे होते कि, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीतील तांत्रिकीकरणाबद्दल ड्रोन फवारणी तांत्रिक सेवाबद्दल माहिती अवगत करून देणे व पारंपरिक शेती मध्ये येणाऱ्या अडचणीवर कश्या प्रकारे मात करता येईल याचे मार्गदर्शन करणे सोबतच आरोग्य शिबीर मध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णास मोफत रोग निदान करून देणे व कोणत्याही तात्काळ सेवेसाठी तत्पर राहणे. याशिवाय सलाम किसान चे काही सहकारी व स्वयंसेवक भागवत सप्ताहा मध्ये आलेल्या व प्रवचनात बसलेल्या भावीभक्तांना पिण्याचे पाणी पंक्तीमध्ये वाटप करणे व इतर सेवा प्रदान करण्यासाठी उपलब्ध होते.

सलाम किसान समूह दरवर्षी याप्रकारे होण्याऱ्या कार्यक्रमास हिरहिरीने सहभाग नोंदवितांना दिसतो व नवनवीन स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करून शेतकऱ्यांना तांत्रिक शेतीबद्दल जाणीवजागृती करण्यावर भर देत असतो. सलाम किसान प्रा. लि. मुंबई कडून अधिकारी वर्ग यामध्ये सुमित मुंगले, व्यवस्थापक-डिझाईन व इव्हेंट्स प्रमुख याशिवाय ड्रोन पायलट टीम, चंद्रपूर जिल्हा यामध्ये अमोल कोहरे, राज सिडाम, बादल बुरांडे, रितेश गजभिये व सहाय्यक कर्मचारी मंगेश गेडाम,आकाश शेडमाके व शुभम वेलाडी उपास्थित होते. रघुकुल आयुर्वेदिक हॉस्पिटल भिसी यांचे कडून डॉ. अमित मुंगले, डॉ. सुबोध गोडबोले, डॉ. कांचन अमित मुंगले, व सहाय्यक कर्मचारी सुहास बावणे व माधुरी लोहारे उपस्थित होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने आरोग्य कर्मचारी धानके व सहाय्य्क आरोग्य कर्मचारी (MPW) उपस्थित होते. या उपक्रमास शेतकऱ्यांचा, नागरिकांचा व येणाऱ्या भावीभक्तांचा भरपूर असा अतिउत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्तुत्य उपक्रमास येणाऱ्या भाविभक्तानी तसेच लाभ घेतलेल्या रुग्णांनी दिलेल्या सेवेबद्दल आयोजकांचे सहृदय आभार मानले.