जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिनचर्या न्यूजच्या बातमीची घेतली दखल !
क्रीडा संकुलनात पाण्याची व्यवस्था, स्वच्छालय गृह झाले साप!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलन मागील अनेक दिवसांपासून समस्याने त्रस्त असून त्यात सु सुविधा नसल्याने इथे सरावासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची कुचंबना होत होती. एक महिन्यापासून येथील पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध नव्हते. स्वच्छालयात सर्वीकडे घाण पसरली होती.
'जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे संकुलनात पाण्याचा हाहाकार' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या बातमीची दखल घेऊन क्रीडा संकुलनात होत असलेल्या समस्यावर तुरंत तोडगा काढला. आणि तिथे असलेल्या वॉटरप्रूफ फायला नवीन मोटर लावून थंड पाणी पिण्याची सुविधा करण्यात आली. तसेच या परिसरात असलेल्या स्वच्छतागृहात वॉशरूम साठी पाणी उपलब्ध नव्हते. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने याची दखल घेऊन त्या संपूर्ण स्वच्छतागृहात पाण्याची सुविधा करून स्वच्छालय साफ करून घेतले. त्यामुळे इथे येण्याला हजारो खेळाडूंना त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणावर दखल घेऊन संबंधित विभागाने स्वच्छता करून घेतली. जिल्हा क्रीडा संकुलनात रोज मॉर्निंग वाकला हजारो नागरिक येथे व्यायाम करण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर इथे हजारो विद्यार्थी विविध स्पर्धेसाठी सराव करीत असतात. मात्र त्यांना या ठिकाणी अनेक समस्यांना समोर जावं लागत होते. दिनचर्या न्यूज मध्ये जिल्हा क्रीडा संकुलनातील बातमी प्रकाशित होताच. या बातमीची दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी तातडीने सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकासह विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे आभार मानले.