सी टी पी एस ऊर्जानगर येथे अवैद्य दारूची खुली विक्री !

सी टी पी एस ऊर्जानगर येथे अवैद्य दारूची खुली विक्री !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या सिटी पॉवर स्टेशन ऊर्जा नगर येथे अनेक दिवसापासून दारू विक्रेत्यांचा जोरशोर धंदा सुरू आहे.
या परिसरात उद्धवाने आपले चार फंटूस तयार करून ऊर्जानगरच्या खैरगाव गेट, दवाखान्याच्या मागे, नवीन मार्केट बँकेच्या एटीएम मागे, आणि आंबोरा चौक या ठिकाणी रोज सकाळी सात वाजता ते एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच वाजता पासून रात्री दहा वाजेपर्यंत या दारू विक्रेत्यांचा जोरदार व्यवसाय सुरू आहे.
या व्यवसायाकडे सी टी पी एस च्या मुख्य गेटवरील सेक्रेटरी, मुख सहमती असल्याची चर्चा होत आहे. कारण गेटमध्ये सामान्य माणसाला कुठल्याही सामान, वस्तू आत मध्ये न्यायची असल्यास त्या सामानाची चौकशी करूनच आत मध्ये जाण्याची परवानगी मिळत असते. मात्र या दारू विक्रेत्यांची कुठलीही चौकशी होत नाही.
या परिसरात सर्व कंपनीचे नोकरदार वर्कर असल्याने
इथे रोज लाखो रुपयांच्या दारूची उलाढाल होत असल्याची सध्या कुजबुज ऊर्जा नगर परिसरात होत आहे. या अवैद्य दारू व्यवसायाकडे कुणाचे पाठबळ आहे. याचा शोध पोलीस प्रशासनाने घ्यावा. या अवैद्य दारू विक्रीमुळे परिसरातील महिलांना, खास करून शाळकरी मुलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात सुशिक्षित, आणि नोकरदार कर्मचारी असल्याने
या दारू विक्रीचा परिणाम सामान्य नागरिकांवर होतात आहे. त्यामुळे या परिसरातील अवैद्य होत असलेली दारू विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकाकडून होत आहे. या परिसरात होणाऱ्या अवैध दारू विक्रीवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष देऊन या परिसरात होत असलेल्या अवैद्य धंद्यावर आळा घालावा अशी मागणी होत आहे.