स्वागत नागरी सहकारी पतसंस्थेचा न्यायालयाने असा दिला निकाल !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील भानापेठ ,अंचलेश्वर वार्डात अजय बंडीवार यांच्या घरी स्वागत नागरिक पतसंस्था मर्यादित नावाची बँक अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे. परंतु मागील काही वर्षांपूर्वी येथील एका संचालकाचा मृत्यू झाल्याने, नवीन संचालकासाठी पद भरती घेण्यात आली नव्हती. त्यानंतर बँकेवर प्रशासक बसवण्यात आले. तीन वर्षापर्यंत बँकेवर प्रशासक राज राहिले. या दरम्यान अनेक कारणाने बँक ढबघाइस गेली.
मागील तीन महिन्या अगोदर पुन्हा या स्वागत नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक घेण्यात आली. यात बंडीवार पॅनल, आणि पानपट्टीवार परिवर्तन पॅनल यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही पॅनलचे चे सहा- सहा सभासद निवडून आले होते. परंतु अजय बंडीवार हे दोन गटातून निवडून आल्यामुळे त्यांना एका गटाचा राजीनामा द्यावे लागला. त्यामुळे संस्थेचे संचालक सदस्य अकरा राहिले. त्यानुसार सहा सदस्याचा कोरम असताना अधिकाऱ्यांनी मान्य केले नाही .
अशा वेळेस निवडणूक अधिकाऱ्यांनी दोनदा सभा पदाअधिकारी निवड करण्यासाठी घेण्यात आली. बंडीवार यांच्या पॅनलच्या पाच सदस्यांनी दोन्ही सभांवर येण्याचे टाळले. परिवर्तन पॅनलचे साही सभासद उपस्थित राहायचे. परंतु निवडणूक अधिकारी कोरम पूर्ण होत नसल्याचा बाणा करून सभा तहकूब करून घेत होते.त्यामुळे संचालकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला.
यामुळे परिवर्तन पॅनलच्या सदस्यांनी नागपूर हायकोर्टात दाद मागण्याचे ठरविले. बॉम्बे नागपूर खंडपीठ येथे संजय सिंग बैस यांच्या नावाने याचिका दायर करण्यात आली.
त्या याचिकेच्या आधारावर नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने 15 एप्रिल 2024 ला परिवर्तन पॅनलच्या बाजूने आदेश जाहीर केले. की, 11 संचालक असल्यामुळे 6 सदस्याचा कोरम हा पदाधिकारी निवडण्यासाठी पुरेशा असल्याचं सांगून पदाधिकाऱ्यांची निवड 6आठवड्याच्या म्हणजेच दीड महिन्यात करण्याचे आदेश न्यायालयाने संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना दिले.