डाँ. सोनारकर यांनी जाणीपुर्वक अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे केले चुकीचे मुल्यांकन, सेवेपासून दुर करण्याचा प्रयत्न !



डाँ. सोनारकर यांनी जाणीपुर्वक अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे केले चुकीचे मुल्यांकन, सेवेपासून दुर करण्याचा प्रयत्न !

खासदार प्रतिभा धानोरकरांचा दणका,

तात्काळ मिळाले रुजु आदेश.

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर : जिल्हîातील राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी काही कर्मचाऱ्यांना सहाय्यक शल्य चिकित्सक यांनी दिलेल्या चुकीच्या मुल्यांकनामुळे कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची भीती निर्माण झाली होती. यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी झाल्यानंतर मा. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी भेट घेऊन सदर विषयासंदर्भात चर्चा केली. मा. मंत्री महोदयांनी सर्व कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत रुजु करुन घेण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरवर्षी योग्य मुल्यांकनाच्या आधारे पुर्नरुजू करण्यात येत असते. अनेक कर्मचाऱ्यांनी मागील 15 ते 20 वर्षांपासून सेवा दिली आहे. त्यांच्या सेवेत कधीही मुल्यांकनाची अडचण आली नाही. कोरोना कालावधीत या सर्व कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा देऊन अनेकांचे प्राण वाचविले. परंतु यावर्षी सहाय्यक जिल्हा शल्य चिकित्सक श्री. भास्कर सोनारकर यांनी जाणीपुर्वक अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चुकीचे मुल्यांकन दाखल करुन कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेपासून दुर करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी भेट घेऊन सदर प्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली. यात काही कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करुन घेतले व सहा कर्मचाऱ्यांना आदेश अप्राप्त होते. यासंदर्भाने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुंबई येथे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन सदर विषयात न्याय देण्याची विनंती केली. मा. मंत्री महोदयांनी तात्काळ जिल्हा शल्य चिकित्सक यांना २४ तासांच्या आत सर्व कर्मऱ्यांना सेवेत रुजु करुन घेण्याचे तोंडी आदेश देऊन कुठल्याही कर्मचाऱ्यांचे नकारात्मक मूल्यांकन होणार नाही अशा सुचना दिल्या. या तोंडी आदेशाचे पालन करीत मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना रुजु आदेश दिले. याप्रकरणी राराष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार मानले.

दिनचर्या न्युज :-