चंद्रपूर पोलिसांनी गोवंशाचे बाराशे किलो मास भरलेले ट्रकसह आरोपीस पकडले !




चंद्रपूर पोलिसांनी गोवंशाचे बाराशे किलो मास भरलेले ट्रकसह आरोपीस पकडले !


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
संतोष निंभोरकर पोलीस उप निरीक्षक, गुन्हे शोध पथक, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर व अंमलदार हे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, ट्रक क. टीएस-१२, युसी 3236 ने गाय, बैलाचे मांस वाहतुक होणार आहे अशा माहितीवरून पंचाचे उपस्थितीत पोलीस स्टॉफसह चोराळा रोड शाही इदगाह येथे बॅरेगेटस लावुन नाकाबंदी केली असता दि.04 /08 /2024 रोजीचे 01 .00 वा सुमारास नमुद वाहनाला थांबुन वाहन चालकास नाव, गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव मोहम्मद उमर मोहम्मद चांद, वय ३८ वर्षे, धंदा चालक, रा.श्रीराम कॉलनी, भारत माता पुतळयाजवळ, जलपल्ली, ता. राजंदानगर, पोलीस स्टेशन पाडी शरीफ, जिल्हा आरआर, तेलंगणा असे सांगितले. तसेच वाहनामध्ये प्रवास करणारे लोकांना त्याचे नांव, गाव विचारले असता 1) साजीद अब्दुल रज्जाक कुरेशी, वय 32 वर्षे, धंदा मांस विक्री, रा. रयतवारी कॉलरी, डिस्पेन्सरी चौक, चंद्रपूर. सध्या रा.स्टार स्टाईल दुकानाचे बाजुला बिनबा गेट रहमतनगर, चंद्रपूर 2) निजाम हमीद शेख, वय 20 वर्षे, धंदा मजुरी, रा. लक्ष्मी टॉकीजजवळ वार्ड नं. 4 गडचांदूर, जि. चंद्रपूर 4) असरार अहमद अबार अहमद, वय 19 वर्षे, धंदा ट्रॉन्सपोर्ट, रा. काला पथर बिलाल नगर, हैदराबाद, ता.जि. हैदराबाद, 4) अब्रार अहमद मोहम्मद रूकनोद्दीन, वय 40 वर्षे, धंदा ट्रॉन्सपोर्ट, रा. काला पथर बिलाल नगर, हैदराबाद, ता.जि. हैदराबाद, पो.स्टे काला पथर, आंध्रप्रदेश असे सांगितले. नमुद वाहनचालकास वाहनामध्ये काय आहे ? याबाबत विचारपुस केली असता गाय, बैलाचे मांस असल्याचे सांगितले. त्यावरून नमुद ट्रकचे मागील दरवाजा चालकाचे मदतीने उघडुन पाहणी केली असता त्यामध्ये बर्फाचे लादीमध्ये मासं व अवयवाचा ढिग लागलेला दिसुन आला. त्यामध्ये जनावराचे मुंडके, पाय व इतर भागाचे मांस दिसुन आले. नमुद कार्यवाहीकामी रात्री पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्याने पंचनामा कार्यवाही करणे शक्य झाले नाही. त्यामुळे सदरचे वाहन पोलीस स्टेशनला पुढील कार्यवाहीकामी डिटेन करण्यात आले. नमुद वाहनाचे इलेक्ट्रिक वजन काटा करण्यात आला नमुद वाहनातील मासांचे बर्फासह वजन अंदाजे १२७० किलो (नाशवंत माल) इतके भरले आहे.
नमुद कार्यावाहीकामी डॉ. आनंद सिताराम नेवारे, पशु वैवकिय अधिकारी, चंद्रपूर हे दि.०४/०८/२०२४ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे हजर झाल्याने वरील नमुद इसम व पंचाचे उपस्थितीत घटनास्थळ पंचनामा कार्यवाही केली. डॉ. आनंद नेवारे यांनी ट्रकचे कंटेनरमधील मांस व अवयवाची तपासणी करून पंचासमक्ष सदरचे मांस व अवयव हे गोवंशाचे असल्याचे सांगितले. असा एकुण १३,०००,००/- रू चा माल डॉ. आनंद नेवारे, पशु वैधकिय अधिकारी, चंद्रपूर यांनी नमुद ट्रकमधील मिळून आलेल्या गोवंशाचे मासं व अवयवमधील वेगवेगळ्या ठिकाणाचे ०५ नमुने प्लस्टिक डब्ळ्यामध्ये काढून घेतले. ट्रक क्रं. टीएस-१२, युसी३२३६ चा चालक नामे मोहम्मद उमर मोहम्मद चांद, वय ३८ वर्षे, धंदा चालक, रा.श्रीराम कॉलनी, भारता माता पुतळ्याजवळ, जलपल्ली, ता. राजंदानगर, पोलीस स्टेशन पाडी शरीफ, जिल्हा आरआर, तेलंगणा व त्याचे साथीदार नामे १) साजीद अब्दुल रज्जाक कुरेशी, वय ३२ वर्षे, धंदा मांस विकी, रा. रयतवारी कॉलरी, डिस्पेन्सरी चौक, चंद्रपूर. सध्या रा. स्टार स्टाईल दुकानाचे बाजुला बिनबा गेट रहमतनगर, चंद्रपूर २) निजाम हमीद शेख, बय २० वर्षे, धंदा मजुरी, रा.लक्ष्मी टॉकीजजवळ वार्ड नं. ४ गडचांदूर, जि. चंद्रपूर ३) असरार अहमद अब्रार अहमद, वय १९ वर्षे. धंदा ट्रॉन्सपोर्ट, रा. काला पथर बिलाल नगर, हैदराबाद, ता.जि. हैदराबाद, ४) अब्रार अहमद मोहम्मद रूकनोद्दीन, वय ४० वर्षे, भंदा ट्रॉन्सपोर्ट, रा. काला पथर बिलाल नगर, ता.जि. हैदराबाद, यांनी संगनमत करून बैल, गाई, वासरू असे गोंवशाचे जनावराची बेकायदेशीर कत्तल करून मांस बाजारामध्ये विकी करण्याचे उद्देशाने ताब्यात बाळगले आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असतांना देखील परराज्यात वाहतुक करण्यासाठी मांसाची नमुद वाहनाने विना परवाना बेकायदेशीरपणे वाहतुक केली आहे.
करीता सर तर्फ निलेश मुडे यांनी दिलेले रिपोर्ट वरुन नमुद ०५ इसमांवर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम १९९५ कलम ५ (अ),५ (क).९ (अ),९(ब), सहकलम ३२५, ३(५) भारतीय न्याय संहिता गुन्हे नोंद करून अटक करण्यात आली आहे ,
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक सुदर्शन मुमक्का , अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु , उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली , पुलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहाय्यक पुलिस निरीक्षक मंगेश भोंगाडे, पुलिस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, संतोष पंडीत, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, इम्रान खान, रूपेश पराते, संतोष कावळे, मंगेश मालेकर, शाहबाज सैयद, दिलीप कुसराम, ईरशाद शेख, रूपेश रणदिवे नी केली