चंद्रपूर बंदला प्रंचड प्रतिसाद हजारो सकल हिंदू समाजाच मोर्चात सहभागी chandrapur



चंद्रपूर बंदला प्रंचड प्रतिसाद हजारो सकल हिंदू समाजाच मोर्चात सहभागी

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेधार्थ.

येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने येत्या शुक्रवारी 23 ऑगस्टला एका शिस्तबद्ध मोर्चाचे आयोजन करण्यात आले .बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा सकाळी 10.30 वाजता शिवाजी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आला. मोर्चात बांगलादेशच्या विरोधात नारे देण्यात आले. मोर्चा तीन हजाराच्या वर तर नागरिकांनी स्वयंपुरतीने सहभागी झाले.

बागला म्हणाले,बंगलादेशातील जनता पेटल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात शरण घेतली.असे असतांना बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू झाले आहेत.हिंदूंची घरे जाळली जात असून त्यांना शासकीय नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे.मानवतेला काळिमा फसण्याचा हा प्रकार असल्याचे ते म्हणाले.बुधवारी या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार , चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार ,सकल हिंदू समाजाचे संयोजक रोडमल गहलोत,रामकिशोर सारडा,मिलिंद कोतपल्लीवार,गुणवंत चंदनखेडे,दामोदर मंत्री,अजय जयस्वाल,रणजीतसिंग सलुजा,ग्यानचंद टहलियानी, यशवंत कलमवार,मधुसुदन रुंगठा,अशोक हासानी,रीतेश वर्मा,प्रा.जुगलकिशोर सोमानी,विनोद कुमार तिवारी,डॉ.शैलेंद्र शुक्ला व पंकज शर्मा यांची उपस्थिती होती.
मोर्चादरम्यान दरम्यान व्यापारी ,शाळा व इतर प्रतिष्ठानांना बंद ठेवण्यात आले. सर्व हिंदू सकल समाज मोर्चा सहभागी झाला .
बंगलादेशातील जनता पेटल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात शरण घेतली.असे असतांना बांगलादेशात मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू झाले आहेत.हिंदूंची घरे जाळली जात असून त्यांना शासकीय नोकरी सोडण्यास भाग पाडले जात आहे.मानवतेला काळिमा फसण्याचा हा प्रकार असल्याचे   संपूर्ण हिंदू समाज या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आहे.