.. या तारखेला जिल्हात मंडल यात्रा चे आगमन
ओ.बी.सी.वी.जे.एन.टी.,एस.बी.सी. चे न्याय हक्कासाठी मंडल यात्रा
विविध स्थळी होणार यात्रेचे स्वागत
पत्रपरीषदेत एड. सातपुते ची माहिती
दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर.:-
ओ.बी.सी., वी.जे.एन.टी. व एस बी सी च्या न्याय हक्कासाठी ओबीसी अधिकार युवा मंच, संघर्ष वाहीणी अखिल भारतीय विमुक्त भटक्या जमाती वेलफेअर व इतर विविध सामाजीक संघटनांचे विद्यमाने मंडल यात्रा च्या माध्यमाने गावोंगावी जनजागृती करण्यात येत आहे. ही यात्रा आज 3 आगस्ट ला नागपुर येथुन वरोरा भद्रावती ला पोहचणार आहे. त्यानंतर 4 आगस्ट ला यात्रेचे चंद्रपुर शहरात आगमन होणार आहे. शहरात विविध स्थानी यात्रे चे स्वागत होणार असल्याची माहीती मंडल यात्रा चे मार्गदर्शक एड. सातपुते यांनी पत्रकार परीषदेत दिली.
यात्रे चे माध्यमातुन ओ.बी.सी. चे जातिनिहाय जनगणना करणे, मराठा समाजाचे सरसकट ओबीसी करण करू नये, महाज्योती संस्थेला १००० कोटी निधी देणे, गोकर भरतील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करणे, शेतकर्याना सरसकट कर्ज माफी करणे, घरकुल योजनेचे निधी 5 लाख रूपये करने, सदर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायीक व बिगर व्यावसायीक शिक्षणात 100 टक्के शिष्यवृत देणे अशा विविध मागण्या घेऊन सरकारचे लक्ष वेधून दबाव निर्माण करण्याचे उद्देशाने मंडल यात्रा भ्रमणं करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 3 आगस्ट ला
भद्रावती, वणी ला मुक्काम करून ०४ ऑगस्ट ला वणीकरून नादेपेरा मार्ग माढेळी, नागरी वरोरा, भद्रावती घोडपेठ वरून चंद्रपूर ला पोहचनार आहे. याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा मंडल यात्रा आयोजन समीती व आयोजकांनी मंडल यात्रा चे स्वागतासाठी जैयत तयारी केली आहे.
ही यात्रा सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर शहरातील वडगांव चौकात पोहोचेल. त्यानंतर संत गजानन महाराज चौक, जनता कालेज, वरोरा नाका, प्रिय दर्शनी इंदिरा गांधी चौक, जटपुरा गेट, गिरनार चौक, जेल गेट, दरगाह सराफा लाईन, गांधी चौक, डा. बाबासाहेब आंबेडकर पुतला चौक, जयंत टॉकीज चौक, छोटा बाजार चौक, जटपुरा गेट, संत केवलराम चौक, मित्रनगर चौक असा मार्गक्रमण करीत सायंकाळी 7.50 मिनीटानी ही यांत्रा दिक्षाभुमी परिसरात पहुचेल. यादरम्यान विविध सामाजिक संघटना यात्रेचे स्वागत करणार आहे.
दिक्षाभूमि परिसरात समता पर्व व भारतीय बौध्द महासभा चे माध्यमातुन मंडल यात्रेचे स्वागत करण्यात येईल. 5 आगस्ट ला सकाळी ठरल्यानुसार मेन रोड वरोरा नाका पुलावरून रामनगर पोलिस स्टेशन, बंगाली कॅम्प, बायपास रोडने विसापूर फाटा, बल्लारपूर शहर, कारवा, जुनीला, पोंभुर्णा, मुल, सिंदेवाही, नागभीड, ब्रम्हपुरी कडे रवाना होणार असल्याची माहीत यावेळी देण्यात आली.
पत्रपरीषदेला एड. पुरूषोत्तम सातपुते, सतीश मालेकर, डा. संजय घाटे, अनिल डहाके उपस्थित होते.
दिनचर्या न्युज