सावधान:- चंद्रपुरात अशा चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय, पोलिसांनी काही तासातच चोरट्यांना केले जेलबंद !




सावधान:- चंद्रपुरात अशा चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय, पोलिसांनी काही तासातच चोरट्यांना केले जेलबंद !

दिनचर्या न्युज '-
चंद्रपूर :-
दिनांक 23/ 9 /2024 ला सकाळी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या प्रेमीला अपारमेंट समाधी वार्ड येथे किरायाने राहत असलेल्या समाधान चुधरी त्याच्या रूमवर चोरट्यांनी हात मारून रूम मध्ये असलेले इलेक्ट्रिक सामान, लॅपटॉप, मोबाईल अशा एकूण 1 लाख 18 हजार च्या सामानाची चोरी झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्या अनवे शहर पोलीस ठाण्यातील डीपी पथकाने क्षणाचाही विलंब न लावता सीसीटीव्ही कॅमेरा च्या माध्यमातून चोरट्यांना टॅप करून बल्लारपूर रेल्वे स्टेशन वरून पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या चार चोरट्यांना पकडण्यात यश मिळवले.
या चोरट्यांची सध्या चंद्रपूर शहरात टोळ्या असून. ते अंध असल्याचे प्रमाणपत्र घेऊन घरोघरी फिरत असतात.
घरी कोणी नसल्याचा किंवा असल्यास आपण अंध असल्याचा बनावट करून संबंधित घरात चोरी करतात. अशा प्रकारच्या शहरात टोळ्या किंवा कुठलेही बनावट प्रमाणपत्र आपल्या घरापर्यंत येऊन दक्षिणा मागत असेल तर वेळीच सावध होण्याचे पोलीस प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
अशीच घटना दि. 23/09/2024 शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या समाधी वार्डात घडली. हे चोरटे त्या अपार्टमेंटवर पाळत ठेवून असायचे.
हे सर्व मित्र पाच वर्षापासून कंपनीत काम करून एका किऱ्याच्या प्लॉट अपार्टमेंट मध्ये राहतात. दोन मित्र झोपून असतानाच या चोरट्यांनी डाव साधला . एक मित्र आजाद गार्डन येथे स्विमिंग करण्यासाठी नेहमीप्रमाणे गेला होता.
तिकडून आल्यावर त्याला चोरी झाल्याचे निदर्शनास येतात. त्यांनी आपल्या मित्रासोबत शहर पोलीस ठाणे गाटून तक्रार नोंदवली . क्षणाचाही विलंब न लावता शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने पोलीस निरीक्षक एलरकुरे मॅडम यांच्या नेतृत्वात काही अवघ्या तासातच चोरांचा छळा लावण्यात यश मिळवले. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 अनवे: 305 (a) 331(3)
आणि त्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्र आढळून आले त्यानुसार पुन्हा 420 अन्वे विविध कलमा अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आणि दिली.
पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
 अशा बनावट व  शहरात फिरणाऱ्या टोळ्या बद्दल माहिती मिळाल्यास आपण जवळच्या पोलीस स्टेशनला कळवण्याचे आव्हानही करण्यात आले आहे.