उद्यापासून चंद्रपुरात श्री माता महाकाली महोत्सवाला प्रारंभ 
यात्रा परिसराच्या विकासासाठी 250 कोटीचा निधी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- 
चंद्रपुरात  मागील तीन वर्षापासून श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने श्री माता महाकाली महोत्सवाचे दिनांक 7 ऑक्टोंबर ते 11 ऑक्टोंबर 20 24 पर्यंत  श्री माता महाकाली मंदिराच्या बाजूच्या मैदानात पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाला प्रारंभ होत आहे.  या महोत्सवात विविध कार्यक्रम  जैन मंदिर संस्था व सराफा असोसिएशन चंद्रपूरच्या वतीने श्री माता महाकाली च्या चांदीच्या मूर्तीची शोभायात्रा, मान्यवराच्या हस्ते 51 फूट उंचीच्या श्री माता महाकाली महोत्सव  ध्वजाचे ध्वजारोहण, या महोत्सवात ज्या परिवारातील कन्यारत्न जन्मास येतील त्या सर्व कन्यारत्नांना मान्यवराच्या हस्ते चांदीचे नाणे वितरण  येणार आहे. आरोग्य शिबिराचे चंद्रपूर ऐतिहासिक चित्राचे, तसेच जगप्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांचे भजन, जागर कवितेचा महिलांचे कवी संमेलन नृत्य जल्लोष, प्रसिद्धी गायिका स्वाती मिश्रा यांचे भक्तिमय संगीतमय कार्यक्रम. लखमापूर हनुमान मंदिर द्वारा सुंदर कांड, माता महाकाली ची आरती व भजन, सायबर सेल द्वारा महिलांना मार्गदर्शन,  कायदेविषयक मार्गदर्शन, प्रसिद्ध गाण्याचे गायक हंसराज रघुवंशी यांच्या भक्तीमय कार्यक्रम, श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखीचा पारंभ, माता महाकाली नगर या पालखीचे विविध देखावे.  यावर्षी 9999  कन्यांचे कन्या पूजन व कन्याभोजन होणार आहे. महिलांसाठी हिरव्या बांगड्यांची भेट देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील लाखो तरुणाचे प्रेरणास्थान युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन. नागपूर येथील रिंकू चंचल आणि पवन ग्रुपच्या वतीने भक्तिमय संगीत कार्यक्रम अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा  श्री माता महाकाली महोत्सवात आस्वाद घेण्याचे आव्हान चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज एनडी  हॉटेल इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून संपूर्ण चंद्रपूर वासियांना केले आहेत. त्यासोबत त्यांचे श्री माता महाकाली महोत्सव ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
 यात्रा परिसराच्या विकासासाठी 250 कोटीचा निधी मंजूर
  चंद्रपूरच्या आराध्य दैवत  माता महाकाली मंदिराच्या सभोवतालच्या जागेसाठी विशेष करून यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुख सुविधा  कुठलीही नाही.
   झटपटनदीपात्रात  भाविक श्रद्धेने आंघोळ करतात. ते पाहिल्या जात नाही. याची खंत आजही आम्हाला आहे. म्हणून नदीत पात्रात अशा प्रकारची भाविकांना आंघोळीची सोय उपलब्ध होईल. अशी व्यवस्था ही या निधीतून करण्यात येईल. संबंधित परिसरातील विकासाच्या दृष्टिकोनातून या निधीत परिपूर्ण विकास  केल्या जाईल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. हे खर आहे की, आम्ही इतर मंदिर पाहता चंद्रपूर माता महाकाली मंदिराच्या परिसरातील विकास  होऊ शकला नाही? त्याला अनेक कारणे खास आहेत, खासकरून  पुरातन विभागाच्या अडचणीमुळे महाकालीला  विकासासाठी आलेला 70 कोटीचा निधी हा आजही धुळखात आहे. परंतु विकास आराखडा तयार करू नही, ते पूर्णत्वास जाऊ शकले नाही. परंतु मातेच्या कृपेने  या नदीतील पाणी स्वच्छ करू . चंद्रपूरकरांना ,
 येणाऱ्या भाविकांना अडीचशे कोटीत विकास कामासाठी  सुख सोयी कशा उपलब्ध करून देता येईल त्याचा परिपूर्ण प्रयत्न करू.
 

 
 
 
 
