उद्याच्या एल्गार महामोर्चा ला बहुजन समता पर्वचा जाहीर पाठिंबा- डॉ. दिलीप कांबळे




उद्याच्या एल्गार महामोर्चाला बहुजन समता पर्वचा जाहीर पाठिंबा- डॉ. दिलीप कांबळे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर.
11 ऑक्टो. ला समस्त आंबेडकरी समाजाचा महामोर्चा काढण्यात येत आहे ह्या मोर्चाला बहुजन समता पर्व चा जाहीर पाठिंबा देण्यात येणार असल्याची माहिती बहुजन समाज पर्व चे मुख्य संयोजक डा. दिलीप कांबळे यांनी पत्रपरीषदेत दिली.
14 ऑक्टो. 1956 ला नागपूर येथे तर 16 ऑक्टो. 1956 ला चंद्रपूर येथे लाखों लोकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिक्षा दिली. सध्या स्थितीत दिक्षाभूमीची जागा 15 व 16 ऑक्टो. च्या धम्मचक्र अनुवर्तन कार्यक्रमासाठी जागा अपुरी पडत असल्याने जागेची कमतरता दूर करण्यासाठी चांदा क्लब ची जागा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी शासकीय विश्राम गृहाची जागा देण्याची मागणी आंबेडकरी समाजाने महामोर्चा द्वारे केली आहे. हि मागणी योग्य असल्यामुळे ह्या मागणीला बहुजन समता पर्व चे मुख्य संयोजक डॉ. दिलीप कांबळे ह्यांनी समर्थन दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचा अभिमान आहेतच, परंतु संपूर्ण विश्व त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात. त्यांनी जगातील सर्वोत्तम संविधान लिहिले आहे. त्यांनी नागपूर व चंद्रपूर येथे धम्मदिक्षा देऊन समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्यायाची मुल्ये मातीत रुजवली. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता ऐतिहासिक दिक्षाभूमीचा विकास होणे काळाची गरज आहे. सध्यास्थितीत दिक्षाभूमीची जागा अपुरी पडत असल्यामुळे दिक्षाभूमीच्या विकासासाठी चांदा क्लब ची जागा देण्यात यावी तसेच व्ही.आय.पी. सर्किट हाऊस ला न तोडता त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक बनविण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेद्वारे बहुजन समता पर्व च्या वतीने करण्यात आली आहे.
पत्रकार परिषदेला डॉ. दिलीप कांबळे, डा. संजय घाटे, एड. वैशाली टोंगे, एड. कवाडे, विनोद लभाने, धनवान ढोके, राकेश नकले, हनुमान चौके, अक्षय बोबडे, नितेश राऊत उपस्थित होते.