पिपरी- सिदूर रस्त्यावरील रेती साठा कुणाचा ? महसूल विभागाने बांधली डोळ्यावर पट्टी!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur reti taskari
चंद्रपूर जिल्ह्यातील याच तालुक्यात असलेल्या पिपरी धानोरा येथील तलाठी साजा क्रमांक आठ हद्दी असलेल्या वर्धा नदीच्या पात्रातून रोज रात्रोला रेती तस्करांचा खेळ खंडोबा सुरू असतो. तर या तस्करांनी दिन दहाडे रेती तस्करी त्याही महसूल कर्मचारी अधिकारी यांना न जुमानता भर दिवसा हाफ टन मध्ये अवैद्य रेती भरून सर्रास रेतीची तस्करी होत आहे. दररोज हजारो ब्रास रेती जेसीबी द्वारे नदीपात्रातून काढून ट्रॅक्टर, हाफ टन सारख्या वाहनाने उचल होत आहे. ती रेती वर्धा नदी पात्रातून उचलून पिपरी- सिंदूर रस्त्यावरील एका शेतात जमा केली जाते. आणि ती नंतर चोरट्या मार्गाने नागरिकांना विकली जाते. यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुळत आहे.
असा सर्रास रेती तस्कराचा उपक्रम सुरू आहे. मात्र याकडे महसूल प्रशासकाने दुर्तराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधली की काय ? असा प्रश्न नागरिकात उपस्थित होत आहे.
संबंधित रेती तस्कराला राजकीय वरदस्त असल्यामुळे सुरुवातीला एक ट्रॅक्टर पासून आता तो हाफ टनवर येऊन पोहोचला आहे. या परिसरात अस्तित्व निर्माण करण्यासाठी सर्व रेतीस तस्करांना काडी मोड करून आपलेच अस्तित्व रावे या भूमिकेतून हा या तस्कराचा डाव आहे. एवढेच नाही तर या तस्कराचे म्हणणे आहे की , महसूल प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी आपले कटपुतली आहेत. आपले कुणी काही करू शकत नाही या भ्रमात या रेती तस्कराची महंती वाढली आहे.
हा साजातील पटवारी यांना गावातील नागरिकांना अनेकदा या संदर्भात ची माहिती दिली परंतु या अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई करत नाही. काही फरक पडत नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
वर्धा नदीच्या पात्रातील रेती उपसा मुळे पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यामुळे जनावरास, मानवासही मोठी जीवित हानी होण्याचे नाकारता येत नाही. संबंधित वाहनामुळे गावातील नागरिकांची झोप उडाली आहे. आता तर या तस्करांची दादागिरी पर्यंत मजल गेल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात होऊ लागली आहे. महसूल विभागांनी या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन रेती तस्करांच्या मुस्क्या आवळावी अशी मागणी होत आहे.