राज्यातील विकासाचा महामेरू...!मै चुनाव हारा था.. हिम्मत नही हारा! , :-सुधीर मुनगंटीवार


राज्यातील विकासाचा महामेरू...!मै चुनाव हारा था.. हिम्मत नही हारा! , :-सुधीर मुनगंटीवार

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक पंचवीस हजार मताधिक्याने विजय उमेदवार ठरलेले सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने स्वीकारले.
लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मोठा फटका बसला होता. त्याचा पराभव पत्करत पुन्हा टायगर जिंदा है! असे म्हणत विधानसभा निवडणुकीत
25 ,985 मताची लीड घेऊन. लोकसभेतील मताची लीड भरून काढत सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर क्षेत्रात चौथ्यांदा तर संपूर्ण कारकिर्दीत आमदार म्हणून सातव्यांदा विजयश्री प्राप्त केला. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे संतोष सिंग रावत यांचा पराभव करीत आपला बोलबाला बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पुन्हा दाखवून दिला.
जनतेचे आशीर्वाद, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि मतदार संघातील विकासाचा झंजावात, भाजपा महायुतीच्या सरकारने केलेल्या विकासावर, राज्यातील लाडकी बहिण योजनेमुळे विजयाची गवसणी मिळाली. पुढील काळात बल्लारपूर मतदार संघ राज्यातील प्रथम क्रमांकाच्या मतदार संघ म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
राज्यात महायुतीला भरघोस विजय मिळाला असून
नवीन सरकार स्थापन होत असलेल्या मंत्रिमंडळात
बल्लारपूर-मुल विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार व महाराष्ट्राचे सुसंस्कृत, अभ्यासु, विकासाचा महामेरू अशा या विकास पुरुष असणाऱ्या नाम. सुधीर मुनगंटीवार यांना आपल्या अभ्यासूपणाचा व दृरदृष्टीपणाचा त्यांच्या आत्तापर्यंतच्या कार्य-कर्तुत्वाची दखल घेऊन राज्याची मोठी जबाबदारी मुनगंटीवार यांना मिळाली तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

दुसऱ्यांवर टिका करण्याचा तुच्छ डाव न खेळता यापुर्वी काय केले व आता काय करणार आहो, हे सांगत विकास कामांवर मतदारांसमोर मते मागीत त्यांनी हा विजय प्राप्त केला. मुनगंटीवार यांच्या विकास कामाचे 'मॉडेल' त्यांचाच विधानसभा क्षेत्रात नाही तर अन्य विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. ते जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांना आपलेच क्षेत्र म्हणून पालकमंत्री म्हणून चांगल्या पद्धतीने विकसित केले.
अशा द्रृष्ट असलेल्या लोकनेत्याला त्याच्या कृतीतून सोने करण्याची किमया दाखवण्याची नामी संधी पुन्हा मतदारांनी दिली आहे.

भाऊंचा एल्गार होता. ‘मै चुनाव हारा हूँ… हिम्मत नहीं हारा!’. हे त्यांचे शब्द होते. विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवत त्यांनी आपले शब्द तंतोतंत खरे ठरवले आहेत. आजच्या त्यांच्या विजयानंतर 'टायगर अभी जिंदा है..', अशा प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

नुकत्याच लागलेल्या निकालात भाजपा सगळ्यात मोठा पक्ष म्हणुन समोर आला आहे. विरोधकात विरोधी पक्ष नेता म्हणूनही निवडण्यात इतकी संख्या त्यांच्याकडे नाही आहे.

सुधीर मुनगंटीवार हे सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठांना भावणारा एकमेव चेहरा म्हणुन समोर येत आहे, हे वेगळे सांगायला नको. भरघोस मतांनी विजयी झालेल्या मुनगंटीवार यांचे मनःपुर्वक अभिनंदन करतांना त्यांना महाराष्ट्राला सगळ्यात पुढे नेण्यासाठी पुनश्च एक मोठी संधी चालुन आली आहे. राज्याच्या राजकारणातील संधीच ते सोनं करून पुनश्च ते टायगर असल्याचे सिद्ध करतील. आणि त्यांच्याकडे संपूर्ण राज्य विकासाचा महामेरू म्हणून
बघत राहील विकास कामाचे किमयागार ठरतील!
राज्यातील कलाटणी देणारी निवडणूक झाली असून चांगल्या चांगल्या धुरंदरांना चारही मुंड्या चीत होण्याची नामुष्की पत्करावी लागली.
लालच, प्रलोभने, आश्वासने देत निवडणुकीत पराभवांचा सामना अनेक धुरंधरांना करावा लागला.