उद्या अमृत महोत्सवी भव्य संविधान सन्मान रॅली
डाँ. आंबेडकर शतकोत्तर जयंती उत्सव समिती चे आयोजन
पत्रपरिषदेत समितीच्या अध्यक्षा निर्मला नगराळे यांची माहिती
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर ब्युरो.:- chandrapur
संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती, चंद्रपूर व विविध धार्मिक, सामाजिक, कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध बुद्ध विहार समिती महिला मंडळ आणि बचत गट प्रतिनिधि तर्फे आज मंगळवार संविधान दिवसानिमित्त डा. आम्बेडकर पूतळा परिसरात संविधान सन्मान रॅली, प्रबोधन सभा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजन केले असल्याची माहिती पत्रपरिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षा निर्मला नगराळे यांनी दिली.
संविधान सन्मान रॅलीचे उद्घाटन मंगळवारी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी एसपी मुम्मक्का सुदर्शन, जिप सीईओ विवेक जॉन्सन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, मुख्य संघटक प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे, एसडीपीओ सुधाकर यादव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डा. मिलिंद कांबळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, शहर पोलीस निरिक्षक प्रभावती एकुरके, डॉ. बंडू रामटेके, डॉ. विवेक बांबोळे, डॉ. विनोद नगराळे, डॉ.प्रवीण डोंगरे, डॉ.स्वप्नील पुणेकर, डॉ.राहुल नगराळे, डॉ.प्रशिक वाघमारे उपस्थित राहणार आहेत. ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतला परीसर येथुन निघनार असुन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौक, जटपुरा गेट, गिरनार चौक, गांधी चौक मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे संपेल.
दुपारी दोन वाजता झालेल्या विशाल प्रबोधन सभेच्या अध्यक्षस्थानी निर्मला नगराळे तर प्रमुख वक्ते दिल्लीचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता एड. अमित कटरनवरे, अतिरिक्त, मुंबई उच्च न्यायालय. पूजा डोंगरे, कवी प्रबोधनकार दंगळकर चंदनशिवे उपस्थित राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिलीप वावरे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सायंकाळी 6 वाजता जागर अश्विनी रोशन आणि टिम यांचा संविधानावर माहितीपर कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एड. राजस खोब्रागडे, महादेव कांबळे, दिलीप डांगे, शंकर वेल्हेकर, कैलास बांबोळकर, पंचफुला वेल्हेकर, प्रेरणा करमरकर, गीता रामटेके, ज्योती शिवणकर, केशव रामटेके, विजय करमरकर, यशवंत मुंजमकर, अनिता जोगे, अंजली नीमकर, अंजली नीमकर, एड. योगिता रायपुरे, ज्योती सहारे प्रयत्न करत आहेत.
संविधान सन्मान रॅलीत संविधान सन्मान रथ, समता सैनिक दल, पथसंचालन आदिवासी रॅली नृत्य, लेझीम पथक, कुस्तीचे प्रात्यक्षिक, महिला ढोल ताशा व बँड पथक, पंजाबी ढोल, विविध वाड्यांचे संविधान रथ, पथनाट्याद्वारे संविधान जनजागृती करणार असल्याची माहिती नगराळे यांनी दिली.
पत्रपरिषदेत अध्यक्षा निर्मला नागराळे, महादेव कांबळे, दिलीप डांगे, शंकर वेल्हेकर, राजस खोब्रागडे, प्रेमदास बोरकर, विजय करमरकर, प्रभुदास माऊलीकर, यशवंत कुंजमकर, पाचफुला वेल्हेकर, छाया थोरात, वैशाली साठे ई. उपस्थित होते.
-----------------------------------