मतदारांची मते व व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची डमी पडताळणी होणार - जिल्हाधिकारी
राजुरा विस काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांचा आक्षेप....
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्याच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात घोळ झाल्याचा आक्षेप काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी प्रशासकीय यंत्रणा व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे व्ही व्ही एम व व्हीव्हीपॅटच्या तपासणी पडताळणी करिता आक्षेप नोंदविला आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील सहा मतदान केंद्रानुसार 135, 343 ,233, 236, 272, आणि 296 या मतदान केंद्रावरील सहा बायलट युनिट, सहा कंट्रोल युनिट, सहावी व्हीव्हीपॅट तपासणी व पडताळणी संदर्भातAnnexure-1 मध्ये रक्कम रुपये दोन लाख 83 हजार दोनशे चालना सह रक्कम भरली आहे.
माननीय मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सदर प्राप्त अर्ज बेल उत्पादन कंपनीकडे 30 दिवसाच्या आज पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. निकाल जाहीर झाल्याच्या दिनांक पासून निवडणूक याचिका कालावधी 45 दिवसापर्यंत निवडणूक याचिका दाखल झाली किंवा कसे याबाबत खात्री केल्यानंतर दाखल नसल्यास तपासणी आणि पडताळणी करिता बेल कंपनीकडून वेळापत्रक निश्चित करण्यात येईल मात्र निवडणूक याचिका दाखल झालेल्या प्रकरणात माननीय न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून कारवाई करावयाची आहे.
मतदानाची यंत्राची तपासणी ही कंपनीच्या नियुक्त अभियंत्याकडून उमेदवाराने निश्चित केलेल्या मतदान क्रमांक केंद्रावर अनुक्रमांकची पडताळणी करण्यात येईल. परंतु अभियंत्याकडून संबंधित विधानसभेत झालेल्या मतमोजणी व व्ही व्ही पॅड, बॅलेट ची मतमोजणी होणार नाही, तर ती मतमोजणी डमी सिम्बॉल तयार करून त्या मशीन मध्ये जास्त 14 से मतदान करून डमी चिन्हाची प्रिंट काढून पडताळणी केली जाणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेतून जिल्हा अधिकारी विनय गौडा यांनी दिली.
सदर कंट्रोल युनिट मधील निकाल व व्हीव्हीपॅट चिट्ट्याची ताळमेळ उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांचे समक्ष करण्यात आलेल्या अभिरूप मतदानाचे निकाल अभियंताकडून दाखवण्यात येईल. कंट्रोल युनिट मधील निकाल व व्हीव्हीपॅड मधील चिट्ठ्यांची ताळमेळ घेण्यात येईल. पण समजा झालेले मतदान कंट्रोल युनिट मधील निकाल व व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्या यांची ताळमेल होत नसेल तर
ती पुढील कारवाई करिता Bel उत्पादन कंपनीकडे पाठवण्यात येईल.
त्यामुळे संबंधित उमेदवारांनी विधानसभेत झालेल्या मतदानाची हेराफेरी व मशीन मध्ये झालेला घोड याची मतमोजणी ,तपासणी व पडताळणी करिता जो अर्ज केला आहे .त्या अर्जावर पाणी फेरणार की काय अशी शंका निर्माण झाली आहे.