10 जानेवारीला मा.सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरात




10 जानेवारीला मा.सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरात

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री लोकनेते कर्मविर मा. सां. कन्नमवारजी यांची १२५ वी जयंती कर्मविर मा. सां. कन्नमवार शतकोत्तर रौप्य जयंतीमहोत्सव समीती आणि बेलदार समाज संघटना चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतीक सभागृह, चंद्रपूर येथे दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे. या सोहळ्याचे उद्‌द्घाटक महाराष्ट्र राज्याचे सन्मा. मुख्यमंत्री मा. ना. देवेन्द्रजी फडणविस साहेब यांचे शुभहस्ते होत असून अध्यक्षस्थानी माजी विरोधी पक्षनेते मा.आ.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार असून स्वागताध्यक्ष लोकप्रिय आ. मा. किशोरभाऊ जोरगेवार आहेत. विशेष अतिथी म्हणून माजी खा. मा. हंसराजजी भैय्या अहिर व प्रमुख अतिथी म्हणून मा. खा. श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, खा. मा. नामदेवराव किरसान, माजी मंत्री तथा आमदार मा.श्री. सुधिरभाऊ मुनगंटीवार, मा.आ.श्री. अभिजीतजी वंजारी, मा.आ. श्री. सुधाकरराव अडबाले, मा.आ.श्री. किर्तीकुमार भांगडीया, मा.आ.श्री.देवरावजी भोंगळे, मा.आ.श्री. करणजी देवतळे, मा. श्रीमती शोभाताई फडणविस माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, मा.श्री. वामनरावजी कासावार माजी आमदार, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
दि. १० जानेवारी २०२४ पासून वर्षभर सदर महोत्सव समिती आणि बेलदार समाज संघटना यांच्या मार्फत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पुर्ण केले. विशेष म्हणजे साहित्यभूषण तु.ना. काटकर लिखीत मा.सां. कन्नमवार पुस्तकाचे पुर्नमुद्रण व वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, पुण्यतिथी कार्यक्रम, विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, अशा अनेक कार्यक्रमानी राबविण्यात आला. दि.१० जानेवारी २०२५ ला या शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवाचा समारोप होत आहे. १० जानेवारी २०२५ ला सकाळी वसंत भवन जटपुरा गेट येथील कन्नमवारजींच्या पुतळ्याला माल्यार्पण, विद्यार्थ्यांची प्रभातफेरी या कार्यक्रमानी सुरुवात होत आहे.
लोकनेते कर्मविर मा.सां. कन्नमवारजींच्या जीवनावर गौरव स्मरणीका २०२५ प्रकाशित करण्यात येत आहे. कर्मविर कन्नवारजींचे कार्य फार मोठे आहे. जुन्या मध्यप्रदेश (सिपीआयबेरार) मध्ये ते आरोग्य मंत्री होते. त्या काळात नागपूर च्या शासकिय मेडीकल कॉलेज ची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री म्हणून असलेल्या काळात नवरगांव, भंडारा, भद्रावती येथे संरक्षण साहित्य निर्मीती कारखाना ताडोबा अभयारण्य ताडोबा उद्यान, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला जोडणारे पुल, रस्ते, वृक्षारोपण ही त्यांची संकल्पना वाशि खाडीचा जो आज पुल उभा आहे ती कर्मविर कन्नमवारजी यांची संकल्पना पत्रकार, साहित्तीक, शिक्षण प्रसारकाचे कार्य महान आहे. जीजाऊ मातेची पहिली जयंती आणि जीजाऊ मातेवरील चरित्र ग्रंथ, जीजाऊ स्मारक सिंदखेड राजा हे त्यांचे काही उदाहरणादाखल कार्य आहेत. त्यांचे कार्य फार महान आहे. अशा लोकनेत्याच्या कार्याचे स्मरण नविन पिढीला व्हावे या उद्देशाने या समितीव्दारे १२५ व्या जयंतीचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.
राजेन्द्र कन्नमवार कार्याध्यक्ष कर्मविर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती,अवधुत कोटेवार सचिव,
कर्मविर मा.सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती
आणि आज पत्रकार परिषदेतून या समितीद्वारे 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमात आयोजित केले आहे