जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या कुच-कामामुळे बांधकामासाठी रेतीचा तुटवडा
महसूलचे काम, पोलिसांकडून छोट्या रेतीवाल्यांची मुस्कटदाबी !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील रेती घाटाचा लिलाव न झाल्याने अवैद्य रेती तस्कराची भरमार सुरू होती. त्यात महसूल विभागाचा महसूल बुडवला जात असल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले गेल्याचे म्हटले गेले.
त्यात जिल्ह्यातील पालकमंत्री अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला निर्देश दिले. पण यात
बाकी इतर अवैद्य धंदे सोडून रेतीवाल्यांना पोलिसांकडून कारवाई होत असल्याने छोट्या-मोठ्या घरकुलाची कामे रखडली गेली आहेत. पोलीस प्रशासनाकडून छोट्या रेती पुरवठा करणाऱ्यांची मुस्कटदाबी होत आहे, मात्र मोठे तस्करांना सर्रास सूट दिल्या जात आहे .सराईत गुन्हेगारासारखी होत असलेली कारवाई,
ट्रॅक्टर, ऑटो टाली ,होत असलेल्या कारवायामुळे चालक-मालकाची बदनामी होत असल्याची चर्चा सध्या शहरात होत आहे.
या धास्तीने सर्व रेती मुळे बांधकामाचे कामे रखडली आहेत. एकीकडे शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कामासाठी लिलाव न झालेल्या नदी गटातून सर्रास रेतीची उचल चालू आहे. परंतु पंतप्रधान आवास योजना ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुरू असताना मात्र प्रशासनाकडून रेती अभावी संपूर्ण बांधकामे रखडली असून यात सर्वसाधारण काम करणारा गोरगरीब मजूर बेरोजगार झाला आहे. कंत्राटदाराचे रेती अभावी कामे रखडली आहेत. एवढेच नाही तर जिल्ह्यातील अनेक हार्डवेअर दुकानदार सुद्धा काम बंद असल्याने हतास झाली आहेत. पंतप्रधान आवास योजना पण घेतलं
यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात अशा प्रकारचा रेतीचा तुटवडा, आणि पोलिसांकडून मुस्कटदाबी कधीही न झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र भारतीय जनता पार्टीचे सरकार आले आणि सर्वसामान्यांचे बांधकाम करण्याचे स्वप्नच- स्वप्नच राहत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान सर्वसामान्यांना आवास योजना देण्यासाठी विविध कार्यक्रमा आयोजित करतात. आणि त्याच घरकुलासाठी सरकार, प्रशासनाकडून मुस्कटदाबी, कारवाही केल्या जातात.
रेतीचा तुटवडा असताना सुद्धा जिल्ह्यातील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार,यांची उदासीनता दिसून येत आहे.लोकप्रतीनीधी कुच -कामे झाले असून फक्त उद्घाटन, सत्कार, हारतुरे यांच्यातच घुरफळले आहेत.
महसूल विभागाचे काम उत्खनन करणाऱ्या महसुलावर नियंत्रण करण्याची असताना सुद्धा याकडे मात्र पोलीस प्रशासनाने छोट्या टाली वाल्यांवर मुस्कटदाबी सुरू केल्याने सर्वसामान्यांना आता नहाक त्रास होणे सुरू झाले आहे.
जिल्ह्यातील शहरी भागापासून ग्रामीण भागातही काँक्रेटरी रस्त्याचे बांधकामे सुरू आहेत. कंत्राटदारांना इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. रेतीवर होत असलेल्या कारवायामुळे, शासनाकडून रेती उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणची कामे रखळली आहेत. शासनाने आपला महसूलही साबूत राहील अशा प्रकारची व्यवस्था करून रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होऊ लागली आहे.