भीषण आगीत टॉंकर जळून खाक! ..ही गाडीची नंबर प्लेट !
ढाबा द ईगल नावाने, कारनामे अनेक वर्षापासून अवैद्य धंद्याचे !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
मोरवा परिसरात द ईगल धाबा नावाने अनेक वर्षापासून अवैद्य धंद्यासाठी प्रसिद्धी होताच? . या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून राकेलचा अवैध्य साठा जमवणे. ट्रान्सपोर्ट लाईनला चोरीचे राकेल विकणे.राकेल बंद झाल्यानंतर या द ईगल धाब्यात अनेक वर्षापासून पेट्रोल ,डिझेलच्या भरून आलेल्या गाड्या या ठिकाणी चोरीच्या मार्गाने इंधन काढल्या जात असून अनेक वर्षापासून अवैद्यधंद्याचे कारनामे या ठिकाणी सुरू असल्याचे सूत्राच्या माहितीनुसार समोर येत आहे.
भरलेल्या गाड्यातून डिझेल पेट्रोलची चोरी होत असल्याची. चर्चा या परिसरात होत आहे.
काल अचानक डिझेल किंवा पेट्रोल भरून असलेल्या
टँकर गाडी नंबर MH 34 BZ 3131 असलेल्या टँकरला सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली. त्याच बाजूला असलेल्या भंगार गोडाऊनलाही आगीने आपल्या विळख्यात घेतले होते.
या भीषण आगीला विजवण्याकरिता जिल्ह्यातील चार ते पाच ठिकाणच्या अग्निशामक गाड्यांना पाचारण करण्यात आले होते.
हा द ईगल ढाबा ग्यांनी सिंग यांच्या मालकीचा असून या ठिकाणी अनेक वर्षापासून डिझेल ,पेट्रोलची तस्करी होत असून अनेकदा या ज्ञानी सिंगवर गुन्हे दाखल असल्याचे बोलले जात आहे.
ही गाडी किरमे नावाच्या मालकाची असून तो बल्लारशाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
तेल साठवणूक करण्यासाठी या गाडीला आय एस ओ नंबर आहे की नाही तपासणी होणार आहे. तसेच या जागेवर महसूल विभागाच्या पेट्रोल डिझेल साठवणी करण्यासाठी परवाना घेतला आहे की नाही ही चौकशी होणार आहे.
या ठिकाणी आठ ते दहा ड्रम डिझेल किंवा पेट्रोल भरले गेले होते ते त्या आगीत आधीच जळून खाक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या संदर्भात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एपीआय योगेश हिवरे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, प्राथमिक माहितीनुसार आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. संबंधित गाडीचे पूर्ण स्पेअर पार्ट जळल्यामुळे गाडीच्या चेचेस नंबर वरून गाडी मालकाचे नंबर घेतल्या जाईल.
नंतर पंचनामा करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.
परंतु माध्यमाच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी जाऊन पहानी केली असता जडलेल्या स्थितीत असलेल्या त्या गाडीचा नंबर प्लेट माध्यमाच्या हाती लागल्या. त्यावरून त्या गाडीचा नंबर आणि मालक कोण आहे. हे माध्यमाना कळले पण पोलीस प्रशासनाला आतापर्यंत कळले नाही.
तोपर्यंत चौकशी सुरू असल्याचे सांगितले ...!