प्रेमाच्या वर्चस्वासाठी दोन वाघाच्या झुंजीत एकाचा मृत्यू !



प्रेमाच्या वर्चस्वासाठी दोन वाघाच्या झुंजीत एकाचा मृत्यू !

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

ताडोबा अंधारी टायगर रिझर्व बंपर झोन रामदेगी क्षेत्रामध्ये दोन वाघाच्या मध्ये जबरदस्त संघर्ष झाला. ही लढाई नयनतारा आणि आपल्या क्षेत्रात वर्चस्व वाजवण्यासाठी झाली. त्यात एका वाघांचा मृत्यू झाला तर दुसरा वाघ स्वरूपात घायाळ झाला.

रामदेगी क्षेत्र हे एक ताडोबातील लोकप्रिय आणि हमखास वाघासाठी दर्शन देणारे बफर झोन आहे.

जो या परिसरातील छोटा मटका हा आपले वर्चस्व गाजवण्यासाठी नेहमी बाहेरील वाघांना या क्षेत्रात घुसू देत नाही. या क्षेत्रातील निळी डोळेवाली वाघीण नयनतारा पर्यटकांसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिच्या प्रेमात आतापर्यंत अनेक पर्यटन कटक पडले. तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. काही वर्षापासून छोटा मटका याने क्षेत्रात आपला जम बसवला आहे. अनेक बाहेर येऊन येणाऱ्या वाघांना त्याने मृत्यूच्या दारात उतरवले. खास करून बजरंग सारख्या वाघालाही त्याने संपविले.
या क्षेत्रात दोन नवीन वाघ आले त्यात वीरभद्र आणि ब्रह्मा या नयनताराच्या प्रेमापोटी( मनोमिलन) करण्यासाठी सक्रिय होते. परंतु छोटा मटका यांनी ब्रह्मा याच्यावर वर्चस्व मिळवले. ब्रह्माचे या लढाईत मृत्यू झाला. तर छोटा मटका घायाळ झाला. याच दिवशी प्राण्यांची जनगणना सुरू होती. रात्री साडेसात ते आठ च्या दरम्यान या दोन वाघात झालेल्या लढाईत त्यांच्या आवाजाने जंगलात थरार उठला. अध्यक्ष दर्शनी नुसार जेव्हा छोटा मटका जंगलाच्या बाहेर आला तो रक्ताने रक्त बंबाळ झाला होता.

छोटा मटका हा (सिएम) नावाने ओळखला जातो. या परिसरात त्याचे वर्चस्व आहे. आतापर्यंत तिन वाघाला ठार केले. तर चार वाघांना जखमी करून क्षेत्रातून जाण्यास भाग पाडले. 

या घटनेची माहिती सफारी हून परत येताना पर्यटकांनी हे दृश्य पाहिले आणि तुरंत याची खबर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. खबर मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यापूर्वीही छोटा मटका आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी कितीतरी वेळा घायाळ झाला. प्रत्येक वेळा तो आपल्याला स्वतः साबित करण्यास यशस्वी ठरला.