पालकमंत्र्याचे स्वप्न पाहणारा आमदार झाला विकासपुरुष !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात आज तिरंगा रॅली काढण्यात आली. भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन 'सिंदूर' या शौर्य, धैर्य आणि बलिदान मानवंदना देण्यासाठी. नॅशनल सेक्युरिटी साठी या उपक्रमात चंद्रपुरात तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली भव्य दिव्य होती. या रॅलीत विविध समाजाचे दीडशेहून अधिक संस्था व समाज सहभागी झाली होती. या रॅलीचे आयोजन चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी मंगलमय केले. परंतु या रॅलीत चंद्रपूर जिल्ह्यातीलच आमदार सहभागी झाले. त्यांना चक्क चंद्रपूर जिल्ह्यातील माजी नगरसेवक तथा भाजप कार्यकर्ते यांनी संचालन करताना भावी पालकमंत्री चे स्वप्न बाळगणाऱ्या आमदारालाच विकास पुरुष संबोधले. यामुळे या नगरसेवकाची थोडा वेळ या कार्यक्रमात चर्चा रंगली होती. की ज्या भाऊला वर्षानुवर्षे विकास पुरुष आणि जवळीक, प्रत्येक कार्यक्रमाच्या मागे आपला फोटो याव यासाठी धळपणा-या या नगरसेवकाला अचानक या आमदाराला विकास पुरुष संबोधण्याची वेळ का आली?
कित्येक वर्ष भाऊच्या मागे राहणार हा भाजप कार्यकर्ता मात्र आता कुठेतरी कन्वर्ट होताना दिसत आहे. काही वर्ष येतील माझी स्थानिक आमदार यांच्या मागे राहून, चंद्रपूर शहरातील जिल्हाध्यक्ष न मिळाल्याने या भाजप कार्यकर्त्याची नाराजी आता स्पष्ट उघडकीस येत आहे. चक्क या कार्यक्रमात भाजपच्या एका आमदाराने उपस्थिती लावतात त्याचा उदो उदो वाहवा करणे. म्हणजेच भाऊला डिवचने तर नवे ना! अशी चर्चा या कार्यक्रमात होऊ लागली होती. आता हे भाऊ याला कितपत जवळ करतात हे मात्र येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत ठरेल. स्वप्न महापौराची असले तरी येणाऱ्या काळातच चंद्रपूरकरांना समजेल. यात तीळ मात्र ही शंका नाही!
मात्र हा आमदार विकास पुरुष कधी झाला हे मात्र भाजप कार्यकर्त्यांनाच कळेनासे झाले!