.. यासाठी अनिल डोंगरे यांच्या चक्काजाम आंदोलन




.. यासाठी अनिल डोंगरे यांच्या चक्काजाम आंदोलन 


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
घुग्घुस कडून येणारा खुटाळा पडोली फाटा रोडवर अतिशय मोठ्या प्रमाणात खड्डे राहत असून या रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे दोन ते तीन वर्षात 25 च्या वर अपघात झाले त्यामधील अनेक लोक मृत्युमुखी पडले. दिनांक 27 तारखेच्या रात्रो समशेर अली व असिफ अली हे दोघे सायकलने आपल्या घराकडे येत असताना खुटाळा गावा समोर रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यामुळे त्यांच्या सायकलचा तोल गेल्यामुळे घुग्घुस कडून भरदाव वेगाने येणाऱ्या वाहनाने ठोस मारल्याने समशेर अली यांचा मृत्यू झाला व आसिप अली हे अपघातात गंभीर स्वरूपात जखमी झाले.ही बातमी दुसऱ्या दिवशी श्री.अनिल डोंगरे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांना कळताच काही पदाधिकारी श्री.विनोद खडसे श्री. विक्की लाडसे सौ.शोभाताई पिदुरकर सौ.रजनीताई ढूमने श्री. बागेश्वर रामटेके व खुटाळा गावातील श्री.अजय कासवटे श्री.अमोल वेलकर श्री राजू बबली श्री रोहित वासनिक श्री योगेश झाडे श्री.राजू आमटे श्री राजकुमार यादव घटनास्थळी जाऊन रस्त्याची पाहणी केली या रस्त्याचे संबंधित टोल अधिकारी व बीओटीचे अधिकारी यांना फोन द्वारे रस्त्या बद्दल व अपघाताबद्दल माहिती दिली व त्यांना घटनास्थळी बोलवण्यात आले.परंतु त्यांनी येण्यास नाकार दिला.श्री.अनिल डोंगरे व सोबत असणाऱ्यांनी रस्त्याच्या अपघातात मृत्यू पडलेल्या व्यक्तीसंबंधी व रस्त्याच्या दुरुस्ती मागणी करिता तेव्हाच चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि रोडवर बसून चक्का जाम आंदोलनाला सुरुवात केली.पडोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार हिवसे साहेब हे आंदोलन स्थळी पोहोचून आंदोलन करत्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. रस्त्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलाउन तात्काळ मधील रस्ता दुरुस्ती व मृत्युमुखी तसेच जखमी झालेल्या व्यक्तीला मदत ची मागणी समोर ठेवली पोलीस स्टेशन पडोली येथील रात्र आठ वाजेपर्यंत झालेल्या चर्चेत टोल अधिकारी व बीओटी चे अधिकारीचे यांनी येत्या चार दिवसात रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात करणार तसेच लगेच मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकाला एक लाखाची मदत देणार असे ठरले. व लगेच मदत देण्यात आली. यावेळी श्री दयानंद नागरकर सौ.दुर्गा बावणे तुषार ढूमने व परिसरातील लोकांनी मोलाचे सहकार्य केले.