वरोरा - चिमूर मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाची राम-टेके करतो लाखोंची वसुली! नागपुरी आक्काचे चांगभलं! chimur chandrapur


वरोरा - चिमूर मधील राज्य उत्पादन शुल्क विभागाची राम-टेके करतो लाखोंची वसुली! नागपुरी आक्काचे चांगभलं!

दिनचर्या न्युज 

चंद्रपूर - (चिमूर) 

चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपविभाग म्हणून वरोरा -चिमूर येथे कार्यालय देण्यात आले आहेत. वरोरा येथे पूर्वी थोरात नावाचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अधिकारी म्हणून होते. त्यांच्या जागी आता निरिक्षक म्हणून मोहतकर या  अधिकाऱ्यांची वर्णी लागली. त्यांच्या अधिपत्याखाली उप निरीक्षक अधिकारी तालुका निहाय उपनिरीक्षक म्हणून येरपुडे, गवळी, हे कार्यभार सांभाळतात. सूत्राच्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरोरा -चिमूर तालुक्याची महिन्याची वसुली करण्यासाठी राम - टेके फंटर नियुक्त केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा - चिमुर डिव्हिजन मध्ये शहरी भागापासून ते ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात बिनधास्त अवैद्य धंद्याचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहेत. मग या दोन विभागांमध्ये शेकडो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिनस्त असलेले आस्थापन   बार, वाईन शॉप, देशी विदेशी दारू दुकानाचे तसेच बिअर शॉपी चे  मन मर्जीने नियम धाब्यावर ठेवून अनेकांना लायसन प्राप्त झाले आहेत.  अशा लायसनधारकाकडून  तसेच अवैद्य दारू विक्रेत्याकडून महिन्याला हप्ता वसुली करण्यासाठी राम -टेके   खाजगी वसुलीबाजाला  विभागातील अधिकाऱ्यांनी  नेमणूक केलीआहे. या फंटाराकडून   डिव्हिजन मधील  वसुलीचे काम दिले गेले आहेत. महिन्याकाठी लाखोची वसुली हा फहंटर करीत असतो. याच्या आशीर्वादाने नागपुरी आक्कांचे चांगभलं होत !

 जिल्ह्यात बनावट दारू अनेकदा पकडून सुद्धा, भरमसाठ बनावट दारूचा पुरवठा जिल्ह्यात  होत असतोच. देशी विदेशी दारूची ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध्य विक्री केली जाते. यापूर्वी शेलार वसुली बाजाने वरोरा डिव्हिजन मध्ये  मोठा कहरच करून टाकला होता.राज्य उत्पादन  शुल्क विभागाचा  आका मात्र बिंदास्त  महिन्याला लाखोची या फंटाराच्या माध्यमातून हप्ते वसुली करीत असल्याचे लायसन धारकाकडूनच बोलले जात आहे.  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यास पूर्ण गौंडबंगाल बाहेर येईल , ते तितकेच  सत्य की,काळ्या दगडावरच्या पांढऱ्या रेषेसारखे समोर येईल!