चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ विभागातील इमारती व झाडांची कत्तल! डिव्हिजन कार्यालयाची होणार तोडफोड ?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-chandrapur
चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प मंडळ विभागातील अधिकाऱ्यांच्या माननीय कारभारामुळे अनेक प्रकल्प तर वादग्रस्त राहिले आहेत. असे असताना पुन्हा चंद्रपूर पाटबंधारे प्रकल्प विभागातील अधीक्षक अभियंता यांच्या निवासस्थानातील झाडांची कटाई करण्यात आली.
आता डिव्हिजन मधल्या प्रस्तावित असलेल्या इमारत आणि त्या परिसरात असलेल्या झाडांची कटाई होणार आहे. अधीक्षक अभियंता प्रवीण झोंड यांच्या या मनमानी कारभाराची झळ आता येथील कार्यालयातील वृक्षावर होणार आहे.
एकीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपायोजना करताना दिसते.
वनसंवर्धन करणे, प्रदूषणावर आळा घालणे, 'झाडे लावा झाडे जगवा' 'एक पेड माँ के नाम' अशा विविध योजना वृक्ष लागवडीसाठी शासन राबवत असतात. त्या योजनेचा मात्र यांच्याकडून बट्ट्याबोड केल्या जात आहेत.
चंद्रपुरातील पाटबंधारे प्रकल्प मंडळातील अधिकारी या सर्व योजनांना केराची टोपली दाखवून कार्यालयातील इमारत, आणि इथे असलेले वृक्ष तोड करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अनेक वर्षांपासून असलेल्या येथील वृक्षांना तोडल्या गेले? प्रस्थापित असलेल्या अधीक्षक अभियंता यांच्या डिव्हिजन कार्यालयातील इमारतीला ही सस्तीग्रस्त करून नवीन बांधण्याचा संकल्प केला आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर नाहक भर पडणार आहे.
तसेच तोडफोड झालेल्या इमारतीचा मलमा, शासकीय जुने फर्निचर, सागवान फाटा, आणि येथील तोडलेल्या वृक्षाची परस्पर विलेवाटेही लावली ? परस्पर विकून आलेली रक्म सरकारी खजानात जमा न करता स्वतःस हजम केली ? या सर्व वृक्षांची तोड करण्यात आली याची वन विभागाकडून परवानगी घेतली की नाही याची चौकशी करण्यात यावी!
ज्या कामासाठी पाटबंधारे विभागाची स्थापन करण्यात आले.ते काम मात्र अनेकदा वादग्रस्त राहिले असून कंत्राटदाराच्या मार्फतीतून अधिकाऱ्याने कमिशनखोरीतून आपले चांगभले करून घेतले. ज्या शेतकऱ्यांसाठी पाटबंधारे विभागाचा उपयोग व्हावा, तसे न होता शेतकऱ्यांच्या शेताचे उत्पन्न कसे वाढवता येईल, त्याला पाणी कसे पुरवता येईल. याकडे लक्ष न देता या कामातून स्वतःचा फायदा कसा करता येईल याकडे या विभागातील अधिकाऱ्यांनी लक्ष दिले आहे. म्हणून अशा शासन विरोधी कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी... तक्रारीतून करण्यात आली आहे.
