चंद्रपूर जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाचा ‘परवाना घोळ’ अधिवेशनात गाजणार?
SIT अहवालात उत्पादन शुल्क विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मोठा विस्फोट होण्याची शक्यता?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर – (प्रतिनिधी : )chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यातील दारू परवाना वाटपातील कथित घोटाळा पुन्हा एकदा राज्यभर गाजण्याच्या तयारीत आहे. आगामी अधिवेशनात SIT अहवाल सादर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून पुढे येत आहे. या अहवालात कोट्यवधींचा भ्रष्टाचार, अनागोंदी, नियमांची उघडीपणे पायमल्ली, आणि कागदोपत्री ‘घोडे पळवण्याच्या’ ससेमिरी उघड होणार असल्याचा दावा आहे. यामध्ये विभागीय दलाल वसुलीसाठी 4 कॉन्स्टेबल अशी सोनसाखळी सक्रिय असल्याचा कथित आरोप स्थानिक सूत्राकडून होत आहे. हे चॅनल दर महिन्याला महत्वाच्या जागेवरून रशीद गोळा करतात असा दावाही माजी अधिकाऱ्याने केला आहे. सूत्राच्या माहितीनुसार दुय्यम निरीक्षक चे अधिकारी चिमूर ,ब्रह्मपुरी नागभीड ,शिंदेवाही, वरोरा अर्ध्या डझनभर जिल्हापर्यंत सक्रिय असल्याचा दावा केला जातो.
वरोरा -चिमूर या दुय्यम निरीक्षक कार्यालयात नागपुरी आक्कासाठी राम-टेके फंटर नियुक्त केला आहे.
‘सुज्या’चा थाट – अधिकाऱ्यांपेक्षा मोठा? असून अधिकाऱ्यापेक्षाही तोऱ्यात वावरात असल्याचे जिल्ह्यात चर्चा आहे.
वाट्या फक्त शेकतात शेकोट्या, आणि सुज्या लोकांच्या कन्फतीत देऊन करतो फाजोट्या, असे उपरोधिक भाष्यही केलं जातं.‘मिटू बाबा’चेही कथित अंतर्गत जाळे? उत्पादन शुल्क विभागात सिस्टीम मध्ये सक्रिय असल्याचे दावे समोर येत आहेत.
यामुळे विभागावर “जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वसुलीच्या अड्ड्याचा” ठपका बसत असल्याचे निरीक्षक वर्तुळात बोलले जात आहे.
बनावट दारू रॅकेट सक्रिय – पण कारवाई दिकाव्यासाठीच?
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूचे रॅकेट सक्रिय असून नाममात्र का रे बाया या विभागाकडून दिकाव्यासाठी केला जातात. असा आरोपही लोकांकडून होतो. काहींच्या मनण्यानुसार ह्या रॉकेटची साखळी वर्षानुवर्ष निर्विघ्न चालू आहे.
‘महामेरू भ्रष्टाचार’ – घुशी सारखा पोखरण्यात
जिल्ह्यातील अभि -चंदन कोल्हापुरी, च-रोड्या यांचे नाव “शिष्टमंडळ अव्वल” म्हणून फिरत असल्याचे विविध मंडळांत ऐकू येते. यांच्या दिमतीला
तर जितू गो… बोलें, हं..मंत, राम-टेके चिमूर, मेश्राम, आपटे (कर्म.. करी)राजुरा, शि-वाजी(गडचांदूर )… ही काही नावं अवैध वसुलीत सैराट असल्याचा कथित दावा अनेकांनी केला आहे. सर्वच परवान धारकांना याबाबतची माहिती असून मूक सहमतीने सर्वच आलबेला सुरू असते. मात्र या नागपूर हिवाळी अधिवेशनात SIT अहवालात उत्पादन शुल्क विभागातील कथित भ्रष्टाचाराचा मोठा विस्फोट होण्याची शक्यता?
