चंद्रपूर बँकेवर I&CI चा छापा ..!,वृत्तपत्रात आलेल्या बातमीने खळबळ ! 'ती बँक' कोणती ? चर्चेला उदान !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
चंद्रपुरात काही दिवसा अगोदर एका प्रादेशिक वृत्तपत्रात चंद्रपुरात आयकर विभागाच्या गुप्तचर आणि गुन्हे अन्वेष शाखेच्या नागपूर पथकाने चंद्रपुरातील एका बँकवर छापा टाकून ७ लाख व्यवहार, ४००० कोटींचे व्यवहार लपवले.
असल्याची बातमी प्रकाशित झाल्याने, 'ती बँक कोणती? चौकशीत काय कारवाई झाली? नेमके छापेमारीत काय आढळले? सर्व गोष्टींना शहरात नागरिकात चर्चा असून स्थानिक वर्तमानपत्रापासून दूर राहिलेल्या बातमीला नागपूरातून प्रकाशित झालेल्या त्या बातमीने चंद्रपूर शहरात चांगलीच चर्चा रंगली जात आहे.
सरकारी बँकेचे सर्व नियम धाब्यावर बसवून
त्या नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि ग्राहकांची ओळख लपवण्यासाठी आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवहार लपवत आहेत. आयकर विभागाच्या गुप्तचर आणि गुन्हे अन्वेषण शाखेने (आय अँड सीआय) ही प्रवृत्ती शोधून काढली आहे.आणि एकामागून एक छापे टाकण्यास सुरुवात केली आहे, ज्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे. बुधवारी रात्री चंद्रपूर येथील एका बँकेवर विभागाने टाकलेल्या छाप्यातून मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याची बाब समोर येत आहे. मग ती बँक कोणती? चौकशीत काय कारवाई झाली? नेमके छापे मारीत काय आढळलं? अशा विविध चर्चांना चंद्रपूर शहरात उदान आले आहेत! आता पुढे काय? अशी आशा चंद्रपूरकरांना लागली आहे.
