अन्यायग्रस्त मेश्राम कुटुंब भद्रावती तहसील कार्यालयासमोर करणार 9 फेब्रुवारी पासून साखळी व आमरण उपोषण




आत्महत्त्या करणाऱ्या परमेश्वर मेश्राम परिवाराला अजूनही मिळाला नाही न्याय.

अन्यायग्रस्त मेश्राम कुटुंब भद्रावती तहसील कार्यालयासमोर करणार 9 फेब्रुवारी पासून साखळी व आमरण उपोषण

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-

भद्रावती तहसील कार्यालयात विष पिऊन आत्महत्त्या करणाऱ्या परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबाला अजूनही जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून न्याय दिला नाही व त्यांच्या आत्महत्तेस जबाबदार तहसीलदार भंडाराकर नायब तहसीलदार खांडरे यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबानाची कारवाई आणि धानोरकर परिवारावर गुन्हे दाखल करून शेतजमीन परत मिळवून दिली नाही, शिवाय अनुसूचित जाती जमाती अत्त्याचारग्रस्त कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामावून घेतले नाही, त्यामुळे मेश्राम कुटुंबातील सदस्य पत्नी वंदना व मुलगा स्वप्नील मेश्राम हे भद्रावती तहसील कार्यालयापुढे येत्या 9 फेब्रुवारी 2026 पासून साखळी व आमरण उपोषण करणार असल्याची माहित मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे, यावेळी पिडीत कुटुंबातील वंदना मेश्राम, स्वप्नील मेश्राम व मनसे चे पदाधिकारी महेश वासलवार, रमेश काळबांधे, राज वर्मा व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

परमेश्वर मेश्राम यांनी भद्रावती तहसीलदार राजेश भांडारकर, नायब तहसीलदार सुधीर खांडरे व तहसील कार्यालयातील काही कर्मचारी यांच्या कडे जमिनीचा फेरफार घेण्यासंदर्भात सतत पाठपुरावा केल्यानंतर आणि त्यासाठी नायब तहसीलदार सुधीर खांडरे व इतर कर्मचारी यांना शेतीचा फेरफार संबंधाने पैसे दिल्या नंतर सुद्धा फेरफार केला नाही, (याबद्दल आत्महत्त्या पूर्वी त्यांनी सुसाईट नोट मध्ये लिहून ठेवले आहे), तहसीलदार राजेश खंडारकर यांनी वेळोवेळी मेश्राम यांना अपमानित केल्याने त्यांच्या मनावर परिणाम होऊन त्यांनी दिनांक 26 सप्टेंबर 2025 ला तहसील कार्यालय भद्रावती येथे विष पिऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला व त्यांचा 6 ऑक्टोबर 2025 ला त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झाला, दरम्यान मेश्राम कुटुंबानी मृतदेह घेण्यास नकार दिला व जोपर्यंत मेश्राम किटुंबाच्या नावाने सातबारा होतं नाही तो पर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली, यावेळी स्वतः जिल्हाधिकारी यांनी मेश्राम कुटुंबाला आश्वासन दिलं होतं की साताबारा सात दिवसात तुमच्या नावावर करण्यात येईल, आर्थिक सहकार्य करणार, उच्च न्यायालयात धानोरकर यांनी हडप केलेल्या जमिनीच्या प्रकरणात सरकारी वकील देऊ व मेश्राम परिवाराला न्याय देऊ, पण अजून पर्यंत मेश्राम परिवाराला न्याय मिळाला नसल्याने व भ्रष्टाचारी तहसीलदार, नायब तहसीलदार मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई झाली नसल्याने मेश्राम कुटुंब आता आंदोलन करणार आहे.

काय आहे प्रकरण

दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी कुठंलाही मोबदला न देता व परमेश्वर मेश्राम यांना जमीन विक्रीच्या मोबदल्यात पंचवटी बार चे तीन लाखाचे चेक देऊन पाच एकर जमीन शेतीची विक्री करून घेतली व शेतीचा फेरफार घेऊन त्यांनी ती शेती त्यांचे भाऊ अनिल धानोरकर यांच्या नावे करून दिली, दरम्यान दिलेले चेक बॉन्स झाले त्यामुळे धानोरकरांनी मेश्राम कुटुंबाची फसवणूक केली, या संदर्भात स्थानिक दिवाणी न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय इथे परमेश्वर मेश्राम यांचे भाऊ शंकर विश्वनाथ मेश्राम, महादेव विश्वनाथ मेश्राम आणि बहीण सुनीता विलास मानकर यांनी केस दाखल करून त्या केस जिंकल्या नंतर सुद्धा धानोरकर परिवाराच्या दबावाने जमिनीचा फेरफार तहसीलदार नायब तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केला नाही, दरम्यान मनावर परिणाम परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्त्या केली त्यामुळे धानोरकर परिवारावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी मेश्राम कुटुंबाकडून होतं आहे.